दुःखद...'आई कुठे काय करते'मधील अनघा उर्फ अश्विनी महांगडेच्या वडिलांचे कोरोनाने निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 06:21 PM2021-05-18T18:21:36+5:302021-05-18T18:22:22+5:30

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिचे वडील प्रदीपकुमार सदाशिव महांगडे यांचे भोर येथील खासगी रुग्णालयात कोरोनाने निधन झाले.

Sad ... Aai Kuthe Kay Karte fame aka Ashwini Mahangade's father dies in corona | दुःखद...'आई कुठे काय करते'मधील अनघा उर्फ अश्विनी महांगडेच्या वडिलांचे कोरोनाने निधन

दुःखद...'आई कुठे काय करते'मधील अनघा उर्फ अश्विनी महांगडेच्या वडिलांचे कोरोनाने निधन

Next

'आई कुठे काय करते' मालिकेत अनघाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नुकतेच तिच्या वडिलांचे कोरोनाने निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून भोर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. 

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिचे वडील प्रदीपकुमार सदाशिव महांगडे यांचे भोर येथील खासगी रुग्णालयात कोरोनाने निधन झाले आहे. ते ५६ वर्षांचे होते. त्यांच्यावर आज भोर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने दोन वर्षांपूर्वी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानची स्थापना केली असून या माध्यमातून तिने अनेक गरजूंना मदत केली आहे.

कोरोनाच्या संकटात रुग्णांना बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर मिळत नाही. अशा परिस्थितीत रुग्णांची आणि पर्यायाने त्यांच्या सोबत आलेल्या नातेवाईकांची जेवणाशिवाय हेळसांड होऊ नये, यासाठी अश्विनी महांगडे आणि रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे.

अश्विनी महांगडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील राणू आक्का साहेब यांच्या भूमिकेतून घराघरात पोहचली. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते या मालिकेत अनघाची भूमिका साकारते आहे. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या आधी अश्विनी महांगडे अस्मिता मालिकेत मनालीच्या भूमिकेत पहायला मिळाली होती. याशिवाय तिने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sad ... Aai Kuthe Kay Karte fame aka Ashwini Mahangade's father dies in corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app