Rupali and vaishali against with whom in bigg boss house | बिग बॉस मराठी २ : रुपाली आणि वैशालीला कोणाचं वागण खटकल?

बिग बॉस मराठी २ : रुपाली आणि वैशालीला कोणाचं वागण खटकल?

ठळक मुद्दे रुपालीने किशोरीताईची माफी मागितली

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल KVR ग्रुपचे खटके उडतच होते. तर किशोरीताईनी सकाळी झालेल्या प्रकारामुळे कॅमेराकडे आपली खंत व्यक्त केली. माधवने किशोरी शहाणे यांना विचारले सगळे झाले का बरोबर, गैरसमज दूर झाले का ? माधवने केलेल्या  या प्रश्नावर किशोरीताईंनी रुपालीला येऊन सांगितले तेव्हा रुपालीचे म्हणणे होते आपल्या ग्रुपमध्ये काय होते आहे, का भांडण होत याबद्दल प्रत्येकालाच जाणून घ्यायचे असते. तर दोघींचे म्हणणे होते की, आपण कधीच जात नाही दुसऱ्यांच्या ग्रुपमध्ये काय सुरु आहे हे जाणून घेण्यसाठी. आपण कधीच दुसऱ्या ग्रुपमध्ये जाऊन डोकावत नाही. तर रुपालीने किशोरीताईची माफी मागितली. रुपालीने किशोरी ताईना जी विचारणा झाली कि, सगळ नीट आहे ना ग्रुपमध्ये त्याबद्दल वीणाला सांगितले तिचे म्हणणे होते मी ग्रुपमध्ये नाहीये, मी वैयक्तिक खेळते आहे जे ग्रुपमध्ये आहेत त्यांनी बोलावे.

 आज घरामध्ये “एक डाव भुताचा” हे साप्ताहिक कार्य रंगणार आहे. या कार्याचा परिणाम पुढील आठवड्याच्या कॅप्टनसीवर होणार आहे. कार्यात वेळोवेळी वाजणाऱ्या बझरनंतर भूत झालेला सदस्य जर सेफमध्ये जाऊ शकला नाही तर तो सदस्य कॅप्टनसीच्या स्पर्धेतून बाहेर पडेल. आता कोण स्पर्धेत राहणार ? आणि कोण बाद होणार ? हे बघणे रंजक असणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rupali and vaishali against with whom in bigg boss house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.