कपिल शर्मा आणि अभिनेता-कॉमेडियन सुनील ग्रोव्हर यांच्यामध्ये झालेला वाद अख्या जगाला माहिती आहे. या वादानंतर सुनिलने कॉमेडी शर्मा शो सोडत दुसरा नवीन कॉमेडी शो सुरू केला होता. मात्र त्या शोला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही.  त्यामुळे हा शो बंद झाला.  त्यानंतर आता सुनिल ग्रोवर सिनेमांकडे वळला. आपल्याला विविध सिनेमातून त्याचे दर्शन घडतच असते. आता चाहत्यांसाठी आनंदाची बातमी  आहे की, रसिकांना खळखळून हसवण्यासाठी आणि त्यांचं तुफान मनोरंजन करण्यासाठी कपिल  आणि सुनिल पुन्हा एकदा रसिकांना हसून हसून लोटपोट करण्यासाठी एकत्र पाहायला मिळणार आहेत.

कोरोनामुळे सर्व मालिका आणि सिनेमांचे शूटिंग बंद असल्यामुळए कोणत्याच मालिकांचे नवीन भागाचे शूटिंग होत नाही. अशामध्ये रसिकांच्या मनोरंजनासाठी प्रत्येक मालिका आणि रिअॅलिटी शो त्यांचे जुने भाग प्रसारित करत आहेत. त्यात आता कपिल शर्मा शोचे देखील जुने भाग प्रसारित होत आहेत. यांत जुन्या एपिसोडसमुळे तुम्हाला पुन्हा एकदा कपिल आणि डॉ. गुलाटीच्या रूपात सुनिल ग्रोवर या कॉमेडीयन जोडीचे पुन्हा एकदा दर्शन घडणार आहे.  या दोघांना अशा प्रकारे एकत्र पाहणे रसिकांसाठी एक मनोरंजनाची पर्वणीच असणार आहे.

मुळात कलिप शर्माचा पहिला भाग सुपरहिट ठरला होता. शोमधील सगळे कॉमेडीयन घराघरांत लोकप्रिय बनले अशात. सुनिल ग्रोवर सा-यांमध्ये भाव खावून गेला. मात्र कुठे ना कुठे हा शो सुपरहिट ठरल्याचे श्रेय कपिलने कधीच टीमला दिले नाही. स्टारडम सांभाळणं आणि ती बराच काळ समर्थपणे टिकवून ठेवणं हे प्रत्येकालाच जमत नाही. अगदी तेसच काही कपिलसह झाले होते.

 

जितक्या वेगाने कपिल लोकप्रियतेच्या यशशिखरावर पोहचला तितक्याच झटकन तो खालीही फेकला गेला. स्वतःला मिळालेलं स्टारडम तो सांभाळू शकला नाही आणि वाट चुकला. विमानप्रवासात सहकलाकारांना मारहाण करणं इथपासून ते आपल्या शोमध्ये पाहुण्यांना वाट बघायला लावणं सगळं काही कपिलच्या विरोधात घडू लागलं. परिणामी या सगळ्या गोष्टींमुळे कपिल डिप्रेशनमध्ये गेला. स्वतःला तो बंद खोलीत कोंडून घेत असे. कुणाला भेटत नसे.  त्यानं बंगळुरु इथं जाऊन डिप्रेशनवर उपचार देखील घेतले होते. 

 

गेल्या काही दिवसांपासून कपिल एकटाच या शोची धुरा सांभाळत आहे. अशातच पुन्हा या दोघांनी त्यांच्यामधील वाद मिटवत एकत्र यावे अशी रसिक देखील ईच्छा बाळगून आहेत. हे दोघे पुन्हा कधी एकत्र झळकतील याकडेच सा-यांचे लक्ष लागले आहे. 
 

Web Title: For This Reason Kapil Sharma, Sunil Grover Back Together-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.