Ratris Khel Chale Will Be Telecast In HIndi Name As Raat ka khel sara | 'रात्रीस खेळ चाले' आता हिंदीतही, या तारखेला येणार रसिकांच्या भेटीला
'रात्रीस खेळ चाले' आता हिंदीतही, या तारखेला येणार रसिकांच्या भेटीला

रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या २ भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याचं बहुतांश श्रेय हे मालिकेतील कलाकारांनाही जातं. मुख्य म्हणजे 'रात्रीस खेळ चाले २', मधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे. या मालिकेची लोकप्रियता पाहता आता हिच मालिका हिंदीमध्ये पाहायला मिळणार आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका हिंदीमध्ये डब करण्यात आली आहे. या मालिकेचे नाव ‘रात का खेल है सारा’ असे ठेवण्यात आले  आहे.  अॅन्ड टीव्ही वाहिनीवर ही मालिका पाहायला मिळणार आहे. २९ फेब्रुवारीला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 


मराठी मालिकेला जसा रसिकांचा प्रतिसाद मिळाला तसाच हिंदी मालिकेला रसिक कसा प्रतिसाद देतात हे पाहणे रंजक असणार आहे. नुकताच मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. मालिकेतील टायल ट्रॅकला रसिकांची भरघोस पसंती मिळत आहे. यावरून मालिकाही मराठी प्रमाणे हिंदीतही रसिकांची पसंती मिळवण्यात यशस्वी ठरेला असा विश्वास मालिकेच्या टीमला आहे. 

'रात्रीस खेळ चाले'च्या सेटवर 'या' व्यक्तीला पाहण्यासाठी होते चाहत्यांची प्रचंड गर्दी


'रात्रीस खेळ चाले' या मालिकेचं चित्रीकरण कोकणात सुरू आहे आणि ज्या घरामध्ये हे चित्रीकरण सुरू आहे तिथे या कलाकारांना पाहण्यासाठी सतत लोकांची गर्दी होत असते. या मालिकेतली बहुचर्चित शेवंता, म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला भेटण्यासाठी चाहते मोठी गर्दी करतात. कोकणात फिरायला येणारी कुंटुंब आवर्जून नाईकांच्या वाड्याला भेट देतात.हे घर म्हणजे जणू एक पर्यटनस्थळच झालेलं आहे. मालिकेतल्या इतर पात्रांना भेटण्याची उत्सुकता सर्वांना असते. पण, त्यातही शेवंताबरोबर फोटो, सेल्फी काढण्यासाठी लोकांची नेहमी गर्दी होत असते.
 

Web Title: Ratris Khel Chale Will Be Telecast In HIndi Name As Raat ka khel sara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.