ठळक मुद्देअपूर्वाचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोला १५ तासांत २५ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले असून अपूर्वाचे फॅन्स या फोटोवर भरभरून कमेंट करत आहेत.

सध्या भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातल्यामुळे भारतात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटी देखील घरातच आहेत. प्रत्येकजण घरात राहून आपापल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. सध्या अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियावर देखील चांगलेच सक्रिय आहेत. ते आपले अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. एवढेच नव्हे तर लाइव्ह चॅटद्वारे आपल्या फॅन्सच्या संपर्कात राहात आहेत. रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमाळकरदेखील सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिच्या एका फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

अपूर्वाने इन्स्टाग्रामवर एक जुना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती खूपच छान दिसत असून हा फोटो काढला त्यावेळी ती केवळ २० वर्षांची होती. तिनेच या फोटोसोबत कॅप्शन लिहिले आहे की, मी २० वर्षांची असताना...

अपूर्वाचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोला १५ तासांत २५ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले असून अपूर्वाचे फॅन्स या फोटोवर भरभरून कमेंट करत आहेत. काहींनी या फोटोत तुला ओळखता देखील येत नाहीये असे म्हटले आहे तर तू खूपच सुंदर दिसतेस अशी कमेंट अनेकांनी या फोटोवर केली आहे.

अपूर्वाचा या फोटोतील लूक खूपच वेगळा आहे. अपूर्वाचे केस खूपच छोटे असून ती हा फोटो काढला त्या वेळात ती खूपच बारीक होती असे आपल्याला पाहायला मिळत आहे.

रात्रीस खेळ चाले’ या मालिकेने जशी प्रेक्षकांची मनं जिंकलीत, तसेच या मालिकेतील कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात घर केलेय. शेवंता आणि अण्णांच्या अदाकारीचे तर चाहते डाय हार्ट फॅन बनलेत. या मालिकेतील भूमिकेसाठी अपूर्वाने सात-आठ किलो वजन वाढवले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ratris khel chale shevanta aka apurva nemlekar shares her throwback picture on Instagram PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.