ठळक मुद्देप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक संजय जाधव आणि उमेश जाधव यांनी देखील या पार्टीचा आस्वाद घेतला.

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले असून या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे. या मालिकेतील शेवंता आणि अण्णांच्या पात्रांचीही जोरदार चर्चा आहे. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. 

 ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेचे कोकणात चित्रीकरण होत असल्याने मालिकेत काम करणारे कलाकार अनेक महिने आपल्या घरापासून दूर राहतात. त्यामुळे अनेकदा त्यांना घरच्या जेवणाची आठवण येते. त्यामुळे घरचे जेवण मिस करणाऱ्या कलाकारांसाठी शेवंताने चिकन पार्टीचे आयोजन केले होते. तिने जेवण करताना काढलेला एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने सेटवर झालेल्या या चिकन पार्टीची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. शेवंताने शेअर केलेल्या या पार्टीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक संजय जाधव आणि उमेश जाधव यांनी देखील या चिकन पार्टीचा आस्वाद घेतला.

रात्रीस खेळ चाले ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ही मालिका संपून वर्ष झाले असले तरी या मालिकेतील दत्ता, अभिराम, छाया, सुषमा, पांडू या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. या मालिकेला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद पाहाता या मालिकेचा दुसरा भाग म्हणजेच रात्रीस खेळ चाले २ प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला. 

रात्रीस खेळ चाले २ या मालिकेच्या पहिल्या भागापासून प्रेक्षकांना ही मालिका चांगलीच आवडत आहे. या मालिकेची कथा तर प्रेक्षकांना आवडली आहे. पण त्याचसोबत या मालिकेतील सगळीच पात्रं प्रेक्षकांचे जीव की प्राण झाले आहेत. 


Web Title: ratris khel chale 2 shevanta aka apurva nemlekar give party on set
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.