'रात्रीस खेळ चाले' ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ही मालिका संपून वर्ष झाले असले तरी या मालिकेतील दत्ता, अभिराम, छाया, सुषमा, पांडू या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. या मालिकेला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता या मालिकेचा दुसरा भाग म्हणजेच 'रात्रीस खेळ चाले २' प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला. 

रात्रीस खेळ चाले २ या मालिकेच्या पहिल्या भागापासून प्रेक्षकांना ही मालिका चांगलीच आवडत आहे. या मालिकेची कथा तर प्रेक्षकांना आवडली आहे. पण त्याचसोबत या मालिकेतील अण्णा, माई आणि शेवंता हे तर प्रेक्षकांचे जीव की प्राण झाले आहेत. या मालिकेमुळे त्यांचा फॅन फॉलॉव्हिंग चांगलेच आहे.


नुकताच माई म्हणजेच अभिनेत्री शकुंतला नरे यांनी झी मराठी वाहिनीवरील मिसेस मुख्यमंत्री मालिकेतील सुमी व समरनं दिलेले चॅलेंज स्वीकारत त्यांच्या नवऱ्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेला फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाईट असून त्यात शकुंतला नरे ओळखता येत नाही आहेत.

खरंतर झी मराठी वाहिनीवरील मिसेस मुख्यमंत्री मालिकेत सध्या लगीनसराई सुरू झाली आहे आणि या मालिकेतील कलाकारांनीच सर्वांना एक चॅलेंज दिलं आहे.

या मालिकेत समर व सुमीचं लवकरच लग्न पार पडणार आहे. त्या दोघांनी नुकतंच प्री वेडिंगदेखील केलं आहे. आता त्यांचं लग्न २२ सप्टेंबर संध्याकाळी ७ पार पडणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने समर व सुमीने सर्वांना त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याचे चॅलेंज दिलं आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील काही कलाकारांनी सुमी व समरचं हे चॅलेंज स्वीकारलं आहे. 

Web Title: Ratris Khel Chaale 2 serial fame Maai Aka Shankuntala Nare's real husband photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.