'रात्रीस खेळ चाले' ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ही मालिका संपून वर्ष झाले असले तरी या मालिकेतील दत्ता, अभिराम, छाया, सुषमा, पांडू या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. या मालिकेला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद पाहाता या मालिकेचा दुसरा भाग म्हणजेच 'रात्रीस खेळ चाले २' प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला. 

रात्रीस खेळ चाले २ या मालिकेच्या पहिल्या भागापासून प्रेक्षकांना ही मालिका चांगलीच आवडत आहे. या मालिकेची कथा तर प्रेक्षकांना आवडली आहे. पण त्याचसोबत या मालिकेतील अण्णा आणि शेवंता हे तर प्रेक्षकांचे जीव की प्राण झाले आहेत. या मालिकेमुळे त्या दोघांनाही चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग मिळाले आहे. 


अपूर्वानं नुकतेच पिवळ्या रंगाच्या साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहते कमेंट्स करत आहेत. या फोटोत ती खूप सुंदर दिसते आहे.

या मालिकेत आता एक विलक्षण वळण आलं आहे. रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत अण्णा नाईक ही भूमिका माधव अभ्यंकर साकारत आहेत तर शेवंताच्या भूमिकेत अपूर्वा नेमळेकर दिसत आहे.

अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले २ या मालिकेमुळेच मिळाली.

अपूर्वाने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांमध्ये देखील काम केले आहे.तसेच इश्क वाला लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती. 


Web Title: Ratris Khel Chaale 2 Fame Shevanta Aka Apurva Nemalekar shared yellow saree pic
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.