रात्रीस खेळ चाले २ या मालिकेच्या पहिल्या भागापासून प्रेक्षकांना ही मालिका चांगलीच आवडत आहे. या मालिकेची कथा तर प्रेक्षकांना आवडली आहे. पण त्याचसोबत या मालिकेतील अण्णा आणि शेवंता हे तर प्रेक्षकांचे जीव की प्राण झाले आहेत. या मालिकेमुळे त्या दोघांनाही चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग मिळाले आहे. 

या मालिकेतील शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिचे सोशल मीडियावर खूप फॉलोवर्स आहेत. ती सोशल मीडियावर खूप सक्रीय असून फोटो व तिचे अपडेट्स देत असते. नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ते विना मेकअप लूकमध्ये दिसते आहे. या फोटोत तिने पाठीला बॅग लावलेली ही दिसते आहे. अपूर्वाने हा फोटो शेअर करत म्हटलं की प्रवासात आपण स्वतःला भेटतो.


'रात्रीस खेळ चाले' मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ही मालिका संपून वर्ष झाले असले तरी या मालिकेतील दत्ता, अभिराम, छाया, सुषमा, पांडू या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. या मालिकेला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद पाहाता या मालिकेचा दुसरा भाग म्हणजेच 'रात्रीस खेळ चाले २' प्रेक्षकांच्या भेटीस आला. 

या मालिकेत आता एक विलक्षण वळण आलं आहे. रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत अण्णा नाईक ही भूमिका माधव अभ्यंकर साकारत आहेत तर शेवंताच्या भूमिकेत अपूर्वा नेमळेकर दिसत आहे.

अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले २ या मालिकेमुळेच मिळाली.

अपूर्वाने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांमध्ये देखील काम केले आहे.तसेच इश्क वाला लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती. 

Web Title: Ratris Khel Chaale 2 Fame Shevanta Aka Apurva Nemalekar shared without makeup photo on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.