ठळक मुद्दे‘उतरन’ या मालिकेत तिने तपस्याची भूमिका साकारली होती. ही भूमिका नकारात्मक असली तरी या भूमिकेने रश्मीला खरी ओळख दिली.

बिग बॉस 13’ लवकरच सुरु होणार आहे. प्रेक्षक या शोची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. साहजिकच बिग बॉसच्या घरात जाणा-या स्पर्धकांच्या नावांची चर्चा जोरात आहे. यातलेच एक नाव म्हणजे, ‘उतरन’ या मालिकेमुळे नावारूपास आलेली टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई. सूत्रांचे मानाल तर रश्मी बिग बॉसच्या घरात जाणार आहे. इतकेच नाही तर बिग बॉसच्या घरात लग्नही करणार आहे.
होय, रश्मी देसाई तिचा बॉयफ्रेन्ड अरहान खानसोबत बिग बॉसच्या घरात लग्न करणार असल्याचे कळतेय. आधी रश्मी घरात एन्ट्री घेईल. यानंतर अरहान बिग बॉसच्या घरात जाईल. यानंतर बिग बॉसच्या घरात दोघांचा विवाह सोहळा होईल.


अर्थात बिग बॉसच्या घरातील हे पहिले लग्न नसेल. यापूर्वी सारा खान हिने बिग बॉसच्या घरात लग्न केले होते. बिग बॉसच्या घराला साक्षी मानत साराने अली मर्चंटसोबत लग्नगाठ बांधली होती. अर्थात हे लग्न फार काळ टिकले नाही. यानंतर बिग बॉसच्या एका सीझनमध्ये भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा हिने बॉयफ्रेन्ड विक्रांतसोबत लग्न केले होते.  


रश्मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली आहे. मॉडेलिंगमध्ये तिला कमालीचा इंटरेस्ट होता. याच काळात भोजपुरी चित्रपटात काम करण्याची संधी तिला मिळाली. तिने अनेक भोजपुरी चित्रपटांत काम केले आहे. यानंतर ती छोट्या पडद्याकडे वळली.

‘उतरन’ या मालिकेत तिने तपस्याची भूमिका साकारली होती. ही भूमिका नकारात्मक असली तरी या भूमिकेने रश्मीला खरी ओळख दिली. यानंतर फिर कोई है, इश्क का रंग सफेद, दिल से दिल तक, परी हूं मैं या मालिकेत ती दिसली. नच बलिए आणि झलक दिखला जा या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्येही ती दिसली. 2012 मध्ये तिने अभिनेता नंदीश संधूसोबत लग्न केले होते. पण चार वर्षांनंतर दोघांनीही घटस्फोट घेतला.


Web Title: rashmi desai and arhan khan to be married in bigg boss 13
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.