'लय भारी दिसतेस..!', 'रंग माझा वेगळा'मधील दीपाच्या रिअल लाइफमधील लूकवर चाहते झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 06:40 PM2021-10-18T18:40:06+5:302021-10-18T18:41:01+5:30

'रंग माझा वेगळा'मधील दीपाच्या ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Rang Maza Vegla Fame Deepa Aka Reshma Shinde Shared photos on social media, photo goes viral | 'लय भारी दिसतेस..!', 'रंग माझा वेगळा'मधील दीपाच्या रिअल लाइफमधील लूकवर चाहते झाले फिदा

'लय भारी दिसतेस..!', 'रंग माझा वेगळा'मधील दीपाच्या रिअल लाइफमधील लूकवर चाहते झाले फिदा

Next

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'रंग माझा वेगळा'ने फार कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत कार्तिक, दीपा, सौंदर्या, ललित, श्वेता आणि आदित्य हे सर्व पात्र प्रेक्षकांना खूपच भावली होती. रंग माझा वेगळा या मालिकेत दीपाची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने साकारली आहे. तिच्या या भूमिकेचे खूप कौतुक होताना दिसते.  रेश्मा शिंदे सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते आणि तिच्या फोटोंना चाहत्यांची खूप पसंतीदेखील मिळताना दिसते. दरम्यान नुकतेच तिने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्री रेश्मा शिंदे सोशल मीडिया इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. तिने हे फोटो शेअर करत लिहिले की, मॉर्निंग व्हाइब्स. या फोटोत रेश्मा शिंदेने लाल रंगाचा कुर्ता आणि डेनिम घातलेली दिसते आहे. या फोटोतील तिच्या स्माइलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांच्या लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. तिच्या या फोटोवर एका युजरने म्हटले की, लय भारी दिसतेस. दुसऱ्या एका युजरने म्हटले ब्युटिफूल. तर आणखी एका युजरने लिहिले की, खूपच सुंदर आहात तुम्ही. 


रंग माझा वेगळा मालिकेत श्वेता दीपिका कार्तिक आणि दीपाची मुलगी आहे का हे जाणून घेण्यासाठी डीएनए टेस्ट करते. मात्र त्यात दीपिका कार्तिकची मुलगी नाही हे समजते. मात्र तिने डीएनएसाठी त्या दोघांच्या केसांचा नमुना घेतला होता. मात्र श्वेताला दीपिकाच त्या दोघांची मुलगी आहे, याची खात्री आहे. त्यामुळे तिला नंतर समजते की कार्तिकची गाडी आएशा पण चालवते. त्यामुळे तो केसांचा नमुना तिचा असेल. तर दुसरीकडे दीपा घराबाहेर कामासाठी जाते. शेजाऱ्यांना कार्तिकीकडे लक्ष ठेवायला सांगते. मात्र कार्तिकी संधीचा फायदा घेत तिचे डॉक्टर मित्र म्हणजेच तिचे वडील कार्तिकला भेटण्यासाठी घराबाहेर पडते. यादरम्यान ती एका गाडीखाली येताना दिसते. त्यामुळे पुढच्या भागात नेमके काय घडेल, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: Rang Maza Vegla Fame Deepa Aka Reshma Shinde Shared photos on social media, photo goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app