Rakhi Sawant Did Urine In Her Pant During the task And Requested To Rubina Dilaik Not To Share It With Anyone | टास्क दरम्यानच कंट्रोल करु शकली नाही राखी सावंत, पँटमध्येच केली लघुशंका

टास्क दरम्यानच कंट्रोल करु शकली नाही राखी सावंत, पँटमध्येच केली लघुशंका

'बिग बॉस सीझन 14' मध्ये राखी सावंत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी कोणतीही कसर बाकी ठेवत नाही. या शोमध्ये ती सर्वाधिक रसिकांचे मनोरंजन करणारी स्पर्धक ठरली आहे. रसिकांनाही राखीचा हा अंदाज चांगलाच पसंतीस पात्र ठरला आहे. राखी सावंतमुळेबिग बॉस १४ कडे चाहते पुन्हा एकदा वळले आहे. प्रत्येक दिवशी राखी रसिकांचे मनोरंजन कसे होईल यावर भर देते.

नुकत्याच पार पडलेल्या भागात मात्र राखी जरा अस्वस्थ दिसली. त्याचे झाले असे की, बिग बॉसकडून स्पर्धकांना टास्क देण्यात आला होता. याच टास्क दरम्यान राखीकडून असे काही घडले की, कोणी याचा विचारही केला नसेल.  टास्क दरम्यान राखी सावंतला टॉयलेटसाठी जायचे होते. मात्र टास्कच्या नियमात ते बसत नव्हते. त्यामुळे जास्त वेळी ती कंट्रोल करु शकली नाही.  आणि तिने पॅन्टमध्ये लघवी केली.


फार वेळ राखी ओल्या कपड्यांमध्ये राहू शकत नव्हती. त्यामुळे राखीने तिच्या टीम लीडर रुबीनाला बोलावून आपला ड्रेस दाखवून संपूर्ण प्रकरण स्पष्ट केले. इतकेच नाही तर याविषयी कोणालाही सांगू नको अशी विनंतीही तिने रूबीना केली होती.

 

रूबीनाच्या मदतीने राखीला अंडरगारमेंट बदलण्यासाठी परवानगी देण्यात आली. रुबीनाला माहिती होते की, असे करणे टास्कच्या नियमात बसणारे नाही. पण शेवटी स्वच्छता महत्वाची असल्यामुळे तिने राखीला बाथरुम वापरण्यासाठी परवानगी दिली. 

यापूर्वी, टास्कच्या पहिल्या दिवशी, राखी जास्त वेळ उपाशी राहू शकत नव्हती. त्यामुळे विविध प्रकारची नाटकं करत रसिकांचे मनोरंजन करीत होती. इतकेच नाही तर या वेळी ती आपली भूक मिटवण्यासाठी केळीची सालही खाताना दिसली होती.एवढेच नाही तर  राखीने सोनाली फोगटलाही केळीची साल खाण्यासाठी दिली होती. सध्या टास्कनुसार घरात फक्त आवश्यक खाद्यपदार्थच स्पर्धकांना खाण्यासाठी दिली जात आहे.त्यामुळे स्पर्धक जेवणासाठी लागणारे राशनचेही बचत करु लागले आहेत. 

मर्यादा लांघू नकोस...! अन् सलमान खाननं राखी सावंतला झाप झाप झापलं

‘बिग बॉस 14’च्या एका एपिसोडमध्ये राखीने डबल मीनिंग व वल्गर कमेंट पास केली. अली गोनीने तिच्या या कमेंटवर आक्षेप घेतला. मग काय, वीकेंडच्या वॉरमध्ये सलमानने हा मुद्दा छेडलाच.सलमानने राखीला तिच्या त्या आक्षेपार्ह शब्दांचा अर्थ विचारला. सलमान संतापला, हे राखीच्या लक्षात यायला उशीर लागला नाही. मी गमतीत बोलले, असे म्हणून तिने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. पण सलमानने यानंतर तिचा चांगलाच क्लास घेतला. तू तुझी इमेज विसरू नकोस आणि शोमध्ये मर्यादा ओलांडू नकोस, अशी तंबीच त्याने राखीला दिली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rakhi Sawant Did Urine In Her Pant During the task And Requested To Rubina Dilaik Not To Share It With Anyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.