bigg boss 14 salman khan scolds rakhi sawant for her do baagh do bangle comment says ashleelta ki hudd par kar di | मर्यादा लांघू नकोस...! अन् सलमान खाननं राखी सावंतला झाप झाप झापलं 

मर्यादा लांघू नकोस...! अन् सलमान खाननं राखी सावंतला झाप झाप झापलं 

ठळक मुद्देशुक्रवारच्या एपिसोडमध्ये राखीने असेच काही केले. तिने आपल्या हातावर चाकूने अभिनव शुक्लाचे नाव लिहिण्याचा प्रयत्न केला. बिग बॉसला याची कुणकुण लागली आणि त्यांनी लगेच राखीला कन्फेशन रूममध्ये बोलावले.

राखी सावंत सध्या ‘बिग बॉस 14’च्या घरात मनोरंजनाच्या नावावर अक्षरश: धुमाकूळ घालतेय. कालच्या वीकेंड का वॉरमध्ये याच कारणासाठी सलमान खानने राखी सावंतला चांगलेच झापले. सलमान खरे तर नेहमी राखीचे कौतुक करताना दिसतो. पण कालच्या एपिसोडमध्ये त्याने राखीला तिच्याच शब्दांत समज दिली. आता राखीने असे काय केले तर बोलू नये ते बोलली.
होय,‘बिग बॉस 14’च्या एका एपिसोडमध्ये राखीने डबल मीनिंग व वल्गर कमेंट पास केली. अली गोनीने तिच्या या कमेंटवर आक्षेप घेतला. मग काय, वीकेंडच्या वॉरमध्ये सलमानने हा मुद्दा छेडलाच.

सलमानने राखीला तिच्या त्या आक्षेपार्ह शब्दांचा अर्थ विचारला. सलमान संतापला, हे राखीच्या लक्षात यायला उशीर लागला नाही. मी गमतीत बोलले, असे म्हणून तिने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. पण सलमानने यानंतर तिचा चांगलाच क्लास घेतला. 
तू तुझी इमेज विसरू नकोस आणि शोमध्ये मर्यादा ओलांडू नकोस, अशी तंबीच त्याने राखीला दिली. एंटरटेनमेंट आणि वल्गॅरिटी याच्यात एक सीमा रेषा आखणे गरजेचे आहे. पण तू सगळ्या मर्यादा लांघल्या आणि अश्लिलतेचा कळस गाठलास, असेही त्याने राखीला सुनावले. राखी यावर स्पष्टीकरण देत राहिली, पण सलमान काहीही ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हता.

बिग बॉसनेही सुनावले
शुक्रवारच्या एपिसोडमध्ये राखीने असेच काही केले. तिने आपल्या हातावर चाकूने अभिनव शुक्लाचे नाव लिहिण्याचा प्रयत्न केला. बिग बॉसला याची कुणकुण लागली आणि त्यांनी लगेच राखीला कन्फेशन रूममध्ये बोलावले. शोमध्ये असे काहीही करू नकोस, ज्यामुळे तुला इजा पोहोचेल, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी राखीला समज दिली. यानंतर राखी ढसाढसा रडू लागली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bigg boss 14 salman khan scolds rakhi sawant for her do baagh do bangle comment says ashleelta ki hudd par kar di

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.