ठळक मुद्दे ‘बिग बॉस 13’वर नाही तर हा शो होस्ट करणारा सलमान खान याच्यावरही राखीने आपली भडास काढली आहे.  

छोट्या पडद्यावरचा सर्वात चर्चित आणि वादग्रस्त असलेल्या शो असलेल्या ‘बिग बॉस’च्या 13 व्या सीझनमध्ये सध्या घमासान सुरु आहे. आता ‘बिग बॉस 13’च्या वादात ड्रामा गर्ल राखी सावंतनेही उडी घेतली आहे. ‘बिग बॉस 13’मध्ये तिच्या नावाचा उल्लेख झाल्याने राखी चांगलीच संतापली आहे. इतकी की, तिने ‘बिग बॉस 13’ला इशारा देत, त्वरित माझी मुलाखत घ्या, असे बजावले आहे. सगळे जग मला ओळखत असताना ‘बिग बॉस 13’मध्ये माझी टिंगल केली जाते, मला बदनाम केले जाते, म्हणजे काय? असा संतप्त सवाल तिने केला आहे. विशेष म्हणजे, केवळ ‘बिग बॉस 13’वर नाही तर हा शो होस्ट करणारा सलमान खान याच्यावरही राखीने आपली भडास काढली आहे.  


आता हे काय प्रकरण आहे, हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सूक असाल. तुम्हाला आठवत असेलच की, एक टास्क पूर्ण करताना शहनाज गिलच्या ड्रामेबाजीला कंटाळून  शेफाली जरीवालाने शहनाजला ‘पंजाबची राखी सावंत’ असे म्हटले होते. नेमक्या याच कारणावरून राखी भडकली आहे. राखीने यासंदर्भात एक नाही तर तीन व्हिडीओ शेअर केले आहेत. सलमान खान तू हे होऊच कसे दिलेस? असा सवाल तिने या व्हिडीओ केला आहे.


 ‘तुम्ही मला काय समजता? शेफाली जरीवाला, शहनाज गिल आणि हिमांशीविरोधात मी तक्रार केली आहे. लंडन, अमेरिका, चीन, भूतान या सर्व देशांचे राष्ट्रप्रमुख मला ओळखतात. मी इतकी लोकप्रिय असताना तुम्ही ‘बिग बॉस’च्या घरात माझी बदनामी करत आहोत. तुम्हाला लाज वाटायला हवी. सलमान खान तू कुठे आहेस? सलमान अंकल... सलमानजी तू तर माझा मित्र आहेस. तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. मला न्याय हवा. राखी सावंतही एक माणूस आहे. तिचे नाव आदराने घ्या. बिग बॉस लोकप्रिय शो आहे, याचा अर्थ या घरात माझी अशी बदनामी व्हावी, असा होत नाही, ’असे बरेच काही राखीने या व्हिडीओत म्हटले आहे. 
  या व्हिडीओत राखी आणखीही बरीच बरळलीय. काय ते तुम्ही पाहाच.


 

Web Title: rakhi sawant angry reaction after hearing her name in bigg boss 13 called salman khan uncle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.