'राजा रानीची गं जोडी' मालिकेत संजीवनी करणार रणजीतची निर्दोष सुटका ? एपिसोडचा असा होणार शेवट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 02:31 PM2021-07-27T14:31:04+5:302021-07-27T14:36:39+5:30

'राजा रानीची गं जोडी' मालिका विलक्षण वळणावर आता संजू कशी त्या गुन्हेगारांपर्यंत पोहचणार ? कशी रणजीतची सुटका करणार ? कोणते अडथळे तिच्या मार्गात येणार ?

Raja Rani Chi Ga Jodi Marathi Serial Episode End With Big Twist, Read More | 'राजा रानीची गं जोडी' मालिकेत संजीवनी करणार रणजीतची निर्दोष सुटका ? एपिसोडचा असा होणार शेवट

'राजा रानीची गं जोडी' मालिकेत संजीवनी करणार रणजीतची निर्दोष सुटका ? एपिसोडचा असा होणार शेवट

googlenewsNext

राजा रानीवर ओढवलेलं संकट अखेर दोघांनी मिळून परतवून लावले आहे. पुन्हा एकदा वाईटावर चांगल्याचा विजय झाला असं म्हणायला हरकत नाही. संजू आणि रणजीत एकमेकांच्या साथीने मोठयातलं मोठं संकट दूर करतात. रणजीतच्या मार्गदर्शनामुळे संजूने खर्‍या गुन्हेगारांचा शोध लावला आणि गुलाबचा डाव मोडीस काढला आहे. आता तो दिवस आला आहे ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. संजु आणि रणजीतच्या आयुष्याला एक नवे वळण मिळणार आहे, एक नवा अध्याय सुरू होणार आहे. 'राजा रानीची गं जोडी' मालिकेचा धमाकेदार आठवडा असणार आहे.

संजूची जिद्द आणि प्रयत्नामुळे रणजीतची निर्दोष सुटका होणार आहे.  गुलाब रणजीतला जी कठोर शिक्षा देण्याचा बेत आखत होती तो आता संजूमुळे पूर्ण होऊ शकणार आहे. मीडियासमोरदेखीलं संजू आणि रणजीचं कौतुक होणार आहे रणजीतच्या सुटकेमुळे कुसुमावती नक्कीच खुश होतील,

 

 

पण रणजीत - कुसुमावती मधील अबोला संजू कधी आणि कसा दूर करेल ? यानंतर गुलाब कोणत नवं कारस्थान रचेल ? अपर्णा – राजश्रीचे कारस्थान कधी घरच्यांच्या समोर येईल अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मालिकेमधून मिळणार आहे. 

आता संजू कशी त्या गुन्हेगारांपर्यंत पोहचणार ? कशी रणजीतची सुटका करणार ? कोणते अडथळे तिच्या मार्गात येणार ? त्याला ती कशी पार करणार हे जाणून घेण्यासाठी बघा राजा रानीची गं जोडी मालिकेचा २९ आणि ३० जुलैचा विशेष भाग रसिकांना पाहता येणार आहे.

Web Title: Raja Rani Chi Ga Jodi Marathi Serial Episode End With Big Twist, Read More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.