हम सबकी पर्वा करें क्यों... म्हणत प्राजक्ता माळीने शेअर केलं नवं फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 05:10 PM2021-01-28T17:10:03+5:302021-01-28T17:12:27+5:30

छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत.

Prajakta mali shared a new photoshoot in black dress | हम सबकी पर्वा करें क्यों... म्हणत प्राजक्ता माळीने शेअर केलं नवं फोटोशूट

हम सबकी पर्वा करें क्यों... म्हणत प्राजक्ता माळीने शेअर केलं नवं फोटोशूट

googlenewsNext

प्राजक्ता माळीने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

प्राजक्ता माळीला जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. तिने यानंतर हम्पी, डोक्याला शॉट यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या. प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे कुटुंबियांचे फोटो, चित्रीकरणाच्यावेळेसचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिने सोशल मीडियावर नुकताच ब्लॅक रंगाच्या ड्रेसमधलं फोटोशूट शेअर केलं आहेत. 'हम सबकी पर्वा करें क्यों... सबने हमारा किया क्या...' असं या फोटोला प्राजक्ताने कॅप्शन देते सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

सध्या प्राजक्ता छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'चे सूत्रसंचालन करताना दिसते आहे. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्राजक्ताने विविध भूमिका साकारल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने लकडाउन चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. तसेच तिने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत असल्याचेही सांगितले.लकडाउन या चित्रपटात प्राजक्ता माळीसोबत अभिनेता अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Prajakta mali shared a new photoshoot in black dress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.