'आई कुठे काय करते'मधील अनघाचा लग्नानंतरचा लूक आला समोर, फोटो झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 01:31 PM2022-01-13T13:31:35+5:302022-01-13T13:32:04+5:30

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिकेतील अनघाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

The post-wedding look of 'Aai Kuthe Kay Karte' fame Anagha came to the fore, the photo went viral | 'आई कुठे काय करते'मधील अनघाचा लग्नानंतरचा लूक आला समोर, फोटो झाला व्हायरल

'आई कुठे काय करते'मधील अनघाचा लग्नानंतरचा लूक आला समोर, फोटो झाला व्हायरल

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेत नुकतेच अभिषेक आणि अनघाचे लग्न पार पडले. त्यामुळे प्रेक्षक खूप खूश आहेत. दरम्यान या मालिकेत अनघाची भूमिका अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) हिने साकारली आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. नुकताच तिने इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोत तिचा मालिकेतील लग्नानंतरचा लूक पाहायला मिळत आहे. 

अनघा उर्फ अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती साडीत दिसते आहे. गळ्यात मंगळसूत्र पाहायला मिळत आहे. तिने हा फोटो शेअर करत सकारात्मक राहा असे लिहिले आहे. अश्विनीचा हा फोटो पाहून मालिकेतील तिचा लग्नानंतरचा लूक असल्याचे बोलले जात आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.


आई कुठे काय करते मालिकेत अभिषेक आणि अनघाचे लग्न निर्विघ्नपणे पार पडते. मात्र अनघाचा पहिला नवरा लग्न मोडण्यासाठी येतो आणि अरुंधतीला मारण्याचा प्रयत्न करतो. मात्र अरुंधतीला आशुतोष वाचवतो. तेव्हा यश गिरीशला मारण्यासाठी घरी जातो हे सर्वांना समजते. हे सर्व आशुतोषला माहित आहे हे समजल्यावर अनिरूद्धची तळपायाची आग मस्तकात जाते आणि तो आशुतोषवर यशला भडकवल्याचा आरोप करतो. तसेच तुमच्यामुळे आमच्या घरात सतत भांडणे होतात असे सांगतो. तुम्ही घरातले नाही आहात असे बोलतो. त्यानंतर आशुतोष लग्नातून जायला निघतो तेव्हा अरूंधती त्याला थांबवते आणि त्याची बाजू घेत त्याची मैत्री स्वीकारते. त्यामुळे मालिकेत आता पुढे काय घडणार, हे जाणून घेण्यासाठी रसिक उत्सुक आहेत.

Web Title: The post-wedding look of 'Aai Kuthe Kay Karte' fame Anagha came to the fore, the photo went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.