अभिनेता आयुषमान खुराणा आपला आगामी चित्रपट 'ड्रीमगर्ल'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच त्याने स्टार प्लस वाहिनीवरील 'नच बलिये'च्या ९व्या सीझनमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याच्यासोबत त्याची सहकलाकार नुशरत भरूचादेखील उपस्थित होती. 


आयुषमानला आपल्या आगामी चित्रपटात 'पूजा'ची भूमिका साकारण्याबद्दल उत्तम समीक्षा लाभत असून ही खास संकल्पना सेलिब्रेट करण्यासाठी ह्या आठवड्‌याच्या नच बलियेमध्ये रोल रिव्हर्सल करण्यात आले. यात सर्व पुरूष स्पर्धक मुलींच्या वेशात तर स्त्रिया स्पर्धक पुरूषांच्या रूपात दिसून आल्या. काहीतरी वेगळे करण्यासाठी परीक्षक रवीना टंडननेआयुषमान खुराणा आणि अहमद खान यांना हील्सवर नाचण्याचे आव्हानही दिले कारण आयुषमान आपल्या चित्रपटात ड्रीमगर्ल साकारत आहे.


त्या दोघांनीही हे आव्हान स्वीकारले आणि ह्या चित्रपटातील ‘दिल का टेलिफोन’ या गाण्यावर हाय हील्स घालून डान्स केला. त्यांचा परफॉर्मन्स पाहून सगळेच थक्क झाले आणि त्यांना सर्वांनी उभे राहून दाद दिली.


आयुषमान हील्समध्ये खूपच कम्फर्टेबल होता हे पाहून सगळ्‌यांनाच आश्चर्य वाटले आणि त्याने अहमद आणि अन्य काही स्पर्धकांसोबत सहज डान्सही केला. या आठवड्‌याला काही जबरदस्त आणि मजेदार परफॉर्मन्सेस पाहायला मिळणार आहेत. ‘नच बलिये ९’ शनिवार - रविवार रात्री ८ वाजता फक्त स्टार प्लसवर हा भाग पहायला मिळेल.


आयुषमान खुराणा सध्या त्याच्या 'ड्रीम गर्ल' या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या ट्रेलरला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे.

या ट्रेलरमध्ये आयुषमानचे एक वेगळेच रूप पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्याचे चाहते 'ड्रीम गर्ल' चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहे.


Web Title: OMG ...! Ravina Tandon gave challenge to Ayushman Khurana in Nach Baliye 9, surprised everyone by completing the challenge.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.