'बिग बॉस' या रियालिटी शोमुळे लोपामुद्रा राऊत हे नाव घराघरात पोहचलं.लोपामुद्रा राऊत ही  'बिग बॉस 10' मध्ये कंटेस्टंट असून शोमधील सर्वात पॉप्युलर कंटेस्टंटपैकी होती. लोपामुद्राच्या विविध अदा रसिकांनी बिग बॉस या शोमध्ये पाहिल्या आहेत. तिच्या ग्लॅमरस लूकसोबतच तिच्या मादक अदांचीही तितकीच चर्चा झाली. बिग बॉस या रियालिटी शो सोबतच मिस इंडिया, मिस दिवा या ब्युटी कॉन्स्टेमध्येही तिनं सहभाग घेतला. 2016 साली झालेल्या मिस युनायटेड कॉन्टिनेन्टंस या स्पर्धेत तिनं भारताचं प्रतिनिधीत्व केलं आणि तिथं ती सेकंड रनर-अप राहिली. 


मॉडेलिंगच्या दुनियेतून आल्यामुळे हॉट आणि सेक्सी अंदाज लोपामुद्रासाठी काही नवा नाही. सोशल मीडियावरही लोपामुद्राचे हॉट आणि सेक्सी अंदाजातील फोटो रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत असतात. ब-याच दिवसानंतर पुन्हा एकदा लोपामुद्रा राऊतने सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले असून सोशल मीडियावर ते खूप व्हायरल होत आहेत.

 

एरव्ही समुद्र किनारी बिकीनी घालत अभिनेत्रींचा अंदाज आपण पाहिले आहे. मात्र याही पलिकडे जात लोपाने थेट बर्फात बिकिनी घालून तिने जबरदस्त फोटोशूट केलं आहे.  गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये तिचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. लोपामुद्राने बर्फ असलेल्या ठिकाणी बिकीनी फोटोशूट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

लोपामुद्रानं अगदी कमी वयातच मॉडेलिंगच्या दुनियेत पाऊल ठेवलं होतं. लोपामुद्राने 2013 साली मिस नागपूर हा किताबही जिंकला होता. लोपामुद्रा राऊत 2017 मध्ये 'खतरों के खिलाडी' सीजन 8 मध्ये सहभागी झाली होती. तिने या शोची सेमी फायनल पर्यंत पोहचली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: OMG Bigg Boss 10 Contestant Lopamudra Raut's bikini photoshoot In Snow pics are HOT, HOT and HOT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.