मलायका अरोराला कोरोनाची लागण झाल्यानंतर 'इंडियाज बेस्ट डान्सर' शोमध्ये नोरा फतेहीची एन्ट्री झाली होती. नोराचं फॅन फॉलोइंग भरपूर असल्याने या शोचा टीआरपी काही दिवसातच अनेक पटीने वाढला होता. पण आता नोराला हा शो सोडवा लागला आहे. कारण मलायका कोरोनातून बरी झाली असून ती कमबॅक करतीय. नोराला शो सोडावा लागत असल्याने या शोची दुसरी जज गीता कपूर भावूक झाली. 

गीता कपूरने तिच्या इन्स्टाग्राम हॅंडलवर नोरासोबतचा फोटो शेअर करत लांबलचक पोस्टही लिहिली आहे. गीताने लिहिले की, 'तू शोमध्ये अशी झाली जशी एखादी ताज्या हवेची झुळूक. माझ्या लाइफचा इतका चांगला भाग होण्यासाठी धन्यवाद बेबी नोरा. मला नाही माहीत की, तू हे कसं केलं. पण इतक्या कमी वेळात तू तुझी इमानदारीने, प्रेमाने, सभ्यतेने एक खास जागा निर्माण केली, जी मलायकाच्या जाण्याने रिकामी झाली होती. मला तुझी खूप आठवण येईल. देवाचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी राहिल'.

नोरा फतेही नुकतीच एका वादग्रस्त व्हिडीओमुळे चर्चेत आली होती. ज्यात कोरिओग्राफर टेरेंस लुईसवर आरोप होता की, त्याने नोराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. या व्हिडीओवरून लोकांनी टेरेंसवर टीका करणे सुरू केले होते. तेव्हा नोराच टेरेंसच्या बचावासाठी आली होती.

(Image Credit : Google)

नोराने सोशल मीडियावर लिहिले होते की, 'धन्यवाद टेरेंस. आजकाल सोशल मीडियात व्हिडीओ मॉर्फ केले जात आहेत आणि फोटोशॉप करून इफेक्ट्स देऊन मीम तयार केले जात आहेत. मला आनंद आहे की, याचा तू त्रास करून घेतला नाही. तुम्ही शांत रहा. ही वेळही निघून जाईल. तुम्ही आणि गीता मॅम माझ्यासोबत इतक्या सन्मानाने वागले, मला प्रेम दिलं आणि एक जज म्हणून शोमध्ये स्वीकारलं. ही माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे'. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Nora Fatehi leaves India's Best Dancer as Malaika returns back fighting corona, Geeta Kapur bids teary goodbye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.