Nina Gupta and Gajraj Rao dancing on the song 'A Mary Johar Jabi' at dance +5 reality show | नीना गुप्ता आणि गजराज राव या रिएलिटी शोमध्ये थिरकले 'ए मेरी जोहर जबी' या गाण्यावर
नीना गुप्ता आणि गजराज राव या रिएलिटी शोमध्ये थिरकले 'ए मेरी जोहर जबी' या गाण्यावर

डान्स+ 5 मधील स्पर्धा आता अगदी चुरशीची झाली आहे. टॉप स्पर्धक स्वतःची जागा कायम टिकवण्यासाठी अपार मेहनत घेत आहेत. स्पर्धकांनी जजना प्रभावित करण्यासाठी उत्कृष्ट डान्स सादर केल्याने येणारा भाग मनोरंजनाच्या दृष्टीने वेगळ्याच पातळीवर पोहोचला आहे. सर्व स्पर्धक जज आणि प्रेक्षकांना भारावून टाकण्यासाठी आणि फायनलमध्ये आपली जागा टिकून राहावी यासाठी जीव तोडून मेहनत घेताना दिसत आहेत. गेल्या चार सीझनप्रमाणे हाही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. या आठवड्यात आयुषमान खुराना, जितेंद्र कुमार, नीना गुप्ता आणि गजराज राव डान्स+ 5 च्या सेटवर शुभ मंगल ज्यादा सावधान चे प्रमोशन करण्यासाठी येणार आहेत.

डान्स +5 चे कॅप्टन पुनीत पाठक, धर्मेश येळंदे, करिष्मा चव्हाण आणि सुरेश मुकुंद हे नेहमी त्यांच्या अथक मेहनत आणि धमाकेदार परफॉर्मन्ससाठी ओळखले जातात. या आठवड्यात हे सर्व कॅप्टन आपल्या सर्वांच्या प्रिय नीना गुप्ता आणि गजराज राव यांचे प्रशिक्षक झाले आहेत. जानाम ग्रुपच्या 'आयत' या अप्रतिम परफॉर्मन्स नंतर नीना गुप्ता यांनी कॅप्टनना टीकाही डान्स मूव्ह शिकवण्यास सांगितले. कॅप्टननीही आनंदाने ही विनंती स्वीकारली आणि नीना गुप्ता व गजराज राव यांच्या जोडीने सदाबहार 'ए मेरी जोहर जबी' या गाण्यावर नृत्य सादर करून शोमध्ये चार चाँद लावले.

सेटवरील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, "दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता आणि गजराज राव यांची केमिस्ट्री वाखाणण्याजोगी होती. शोचे कप्तान हे उत्तम प्रशिक्षक आहेत हे सिद्ध झालं असून मनोरंजनाचा पारा अधिकच उत्तरोत्तर चढतच जाणार आहे."


धमाकेदार परफॉर्मन्स आणि सर्व मस्ती पाहण्यासाठी डान्स +5 या शनिवार आणि रविवार रात्री ८.००  वाजता फक्त स्टार प्लसवर पहा.

Web Title: Nina Gupta and Gajraj Rao dancing on the song 'A Mary Johar Jabi' at dance +5 reality show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.