'मिसेस मुख्यमंत्री'मध्ये नवीन ट्विस्ट, सुमीचा होकार मिळवण्यासाठी समर देणार शोले स्टाईलमध्ये जीव?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 08:13 PM2019-08-27T20:13:04+5:302019-08-27T20:13:31+5:30

'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेत आलाय नवीन ट्विस्ट

New twist in 'Mrs Mukhyamantri' serial | 'मिसेस मुख्यमंत्री'मध्ये नवीन ट्विस्ट, सुमीचा होकार मिळवण्यासाठी समर देणार शोले स्टाईलमध्ये जीव?

'मिसेस मुख्यमंत्री'मध्ये नवीन ट्विस्ट, सुमीचा होकार मिळवण्यासाठी समर देणार शोले स्टाईलमध्ये जीव?

googlenewsNext


झी मराठी वाहिनीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' मालिका जूनच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांनी खूप चांगली दाद मिळते आहे. या मालिकेतील समर पाटील व खानावळीची मालकीण सुमी यांच्या मैत्रीनं सगळ्यांच्या मनाचा चांगलाच ठाव घेतला होता. मात्र आता त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं असून मालिका रंजक वळणावर आली आहे.


समर पाटील मुख्यमंत्री बनण्यासाठी रखमा नामक मुलीशी लग्न लावून देण्याचं ज्योतिषी बुवा सांगतात. त्यानंतर रखमा मिळते. ही रखमा म्हणजे खानावळीची मालकीण सुमीच असते. तसेही समर व सुमीच्या मैत्रीचं हळूहळू प्रेमात रुपांतर होतच होतं. त्यात समर त्याच्या घरी सुमीशी लग्न करण्यासाठी होकार देतो.

खरंतर समरची आईला सुमी अजिबात आवडत नसते आणि नाईलाजास्तव त्या तिच्याशी समरचं लग्न ठरवितात. मात्र समर व तात्यांनी सुमीला न विचारता सगळं ठरवल्यामुळे सुमी नाराज होऊन लग्नासाठी नकार देते.

शेवटी समर शोले स्टाईलमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून सुमीला लग्नासाठी विचारतो जर तू तुझं उत्तर दिलं नाही तर मी जीव देईन असं सांगतो. हा व्हिडिओ नुकताच झी मराठीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.


याशिवाय आणखीन एक व्हिडिओ झी मराठीनं इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात लग्नाचा प्रस्ताव घेऊन समरच्या घरातले सर्व सुमीच्या घरी जातात. समरच्या आईचा रुबाब पाहून त्यांना धडा शिकवण्याचा निर्णय सुमी घेते. ती त्यांच्या गाडीची हवा काढून पंक्चर करते, असं या व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे.


मिसेस मुख्यमंत्री मालिकेच्या आगामी भागात समर व सुमीचं लग्न ठरेपर्यंत विविध घडामोडी पहायला मिळणार आहे, असं चित्र दिसतंय.

Web Title: New twist in 'Mrs Mukhyamantri' serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.