Never seen 'Bigg Boss', never seen series and movies .., this is the love story of Sharmishtha and Tejas | ना पाहिले 'बिग बॉस', ना पाहिल्या मालिका व सिनेमे..,अशी आहे शर्मिष्ठा व तेजसची लव्हस्टोरी 

ना पाहिले 'बिग बॉस', ना पाहिल्या मालिका व सिनेमे..,अशी आहे शर्मिष्ठा व तेजसची लव्हस्टोरी 

'बिग बॉस मराठी' या रिअ‍ॅलिटी शोमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचा नुकताच साखरपुडा पार पडला. लॉकडाऊनचे काही नियम शिथिल झाल्यानंतर नाशिकमध्ये कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत शर्मिष्ठाने साखरपुडा केला. इगतपुरीच्या रिसोर्टमध्ये हा सोहळा पार पडला. ऑक्टोबर महिन्यात ती लग्नबेडीत अडकणार आहे. तेजस हा 'बोस' कंपनीत रिजनल सेल्स मॅनेजर आहे. 


टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत शर्मिष्ठाने सांगितले की, 'आमचे अरेंज मॅरेज असले, तरी हे 'लव्ह मॅरेज' आहे असेच मी म्हणेन. माझी बहीण सुप्रियाने आमची ओळख करुन दिली. त्याला पहिल्या भेटीतच मी आवडले होते. त्याने मला लग्नाची मागणी घातली, पण मी थोडा वेळ घेतला. काही महिन्यांनी होकार दिला.'दिल तो पागल है' सिनेमासारखे फिल्मी काहीसे झाले. तुम्हाला ते आतून वाटते… हाच आपला 'मिस्टर राईट' आहे, याचा कौल अंतर्मनाने मला दिला.' 

तिने पुढे सांगितले की, तेजस फार मालिका पाहत नाही. त्यामुळे मी कोण आहे, हेच त्याला माहित नव्हते. अर्थात माझीही तीच अट होती. त्याने माणूस म्हणून मला आधी ओळखावे. मग माझी अभिनेत्री म्हणून त्याला ओळख व्हावी. माझे स्थळ गेल्यावर त्याने माझा 'चि व चि. सौ. का.' हा चित्रपट पाहिला, नंतर काही मालिका वेबवर पाहिल्या. त्याला माझ्या क्षेत्राचा, इथल्या वेळांचा अंदाज आहे. तो फोक डान्सर म्हणून शो करायचा. त्याचे काही मित्रही या क्षेत्रात आहेत. त्यामुळे वेगळे क्षेत्र असून जुळवताना फारशा अडचणी आल्या नाहीत. त्याला सोशल मीडिया, लोकांशी संपर्क साधणे, हे कसे जुळवून घेता येईल, याबाबत मला साशंकता होती. पण त्याने फारच छान जमवून घेतले आहे याचा मला आनंद आहे.


सध्या अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत सध्या 'सुखांच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेत 'संयोगिता'ची भूमिका साकारात आहे. याआधी तिने 'मन उधाण वाऱ्याचे', 'उंच माझा झोका' या मालिकेत काम केले आहे. मात्र 'बिग बॉस मराठी'मुळे ती लोकप्रिय झाली. पहिल्या पर्वात 'वाईल्ड कार्ड' एन्ट्री घेणाऱ्या शर्मिष्ठा राऊतने थेट फायनलपर्यंत मजल मारली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Never seen 'Bigg Boss', never seen series and movies .., this is the love story of Sharmishtha and Tejas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.