Neha pendse share her pink dress photoshoot | गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा

अभिनेत्री नेहा पेंडसे मराठी आणि हिंदी दोनही ठिकाणी काम केले आहे. 'बिग बॉस12' मध्ये ही नेहा दिसली होती. नेहा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते.  सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. तसंच आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्ससह शेअर करते. नेहमी नेहा तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. यावेळी मात्र नेहाने गुलाबी रंगाच्या ड्रेसमधलं फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. गुलाबी रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये नेहा खूपच सुंदर दिसते आहे. नेहाच्या चाहत्यांना तिचा सिंपल लूक भावला आहे. फोटोवर चाहत्यांनी लाईक्स सह कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून नेहा टीव्हीवरील कॉमेडी शो 'भाभी जी घर पर है'शोमध्ये दिसणार अशी चर्चा होती. 'भाभी जी घर पर है' या मालिकेची निर्माती बेनिफर कोहली अनिता भाभीच्या भूमिकेत नेहा पेंडसेला घेण्यासाठी फार उत्सुक आहे. नेहाने बेनिफरच्या जुन्या शोमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. मात्र या चर्चांना पूर्णविराम देत नेहा म्हणाली होती, माझ्याकडे या शोची ऑफर आलेली नाही. त्यामुळे या शोमध्ये मी काम करत नाही आहे. 


 मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. नेहा जून चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात नेहासोबत अभिनेता सिद्धार्थ मेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या दोघांव्यतिरिक्त किरण करमरकर व रेशम हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत..

बोल्ड आणि ग्लॅमरस नेहा पेंडसेच्या साडीतल्या दिलखेचक अदा पाहून व्हाल खल्लास!

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Neha pendse share her pink dress photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.