तुमच्या अंगी कला असेल तर यश, पैसा आणि प्रसिद्धी नक्की मिळते. हे सिद्ध करून दाखवलंय बॉलीवुडची गायिका नेहा कक्कर हिने. नेहा सध्या एका सिंगिंग रियालिटी शोची जज आहे. शिवाय तिने बॉलीवुमध्ये गायिका म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

 

विशेष म्हणजे ज्या शोमध्ये ती जज आहे त्याच शोमधून तिने तिच्या करियरची सुरूवात केली होती. याच शोच्या दुसऱ्या सीजन पासून केली होती. जेव्हा नेहा 11वीमध्ये होती. तेव्हा ती कंटेस्टेंट म्हणून या शो मध्ये गेली होती. 

या शोमध्ये ती त्यावेळी यश मिळवू शकली नाही. तिल रिजेक्ट करण्यात आलं होतं. तरीही ती खचली नाही. मोठ्या मेहनतीने तिने स्वतःची यशस्वी गायिका अशी ओळख निर्माण केली. नेहा आज बॉलिवूडच्या टॉप सिंगर्सपैकी एक आहे. ती गाण्याचे 10 ते 15 लाख रुपये ती मानधन घेते. एखाद्या सिनेमात तिला गाणे कंपोज करण्यासाठी घेतले गेले तर ती दोन ते तीन लाख रुपये महिन्याला घेते. 


4 वर्षांची होती तेव्हापासूनच तिने संगीताचे धडे घेण्यस सुरुवात केली होती. नेहाने तिचा भाऊ टोनी कक्कड आणि बहीण सोनू कक्कड यांच्याकडून प्रशिक्षण घेतली. नेहा सुरुवातीला आपल्या भाऊ बहिणीसोबत जागरणमध्ये गायची. गायनातील यशामुळेच नेहा सध्या मुंबईच्या वर्सोवा येथील 3BHK अपार्टमेंटमध्ये राहते. ज्याची किंमत 1.2 कोटी रुपये आहे. नेहाकडे आठ महागड्या आलिशान कार आहेत. काही दिवसांपूर्वीच नेहाने मर्सिडीज खरेदी केली आहे. तिच्या या नवीन कारची किंमत 95.72 लाख आहे. नेहाची संपत्ती 51.80 कोटी एवढी आहे.

Web Title: Neha Kakkar's Net Worth 2020 Will Surely Leave You Stunned-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.