neha kakkar gets emotional On the indian idol set memes viral | नेहा कक्करचे पुन्हा ‘रडूबाई रडू...’ आणि Memes पाहून तुम्हाला येईल हसू
नेहा कक्करचे पुन्हा ‘रडूबाई रडू...’ आणि Memes पाहून तुम्हाला येईल हसू

ठळक मुद्देइंडियन आयडॉल 10 नंतर नेहा ब्रेकअपमुळे चर्चेत आली होती.

‘इंडियन आयडल’चे 11 वे सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तूर्तास या सीझनचा ऑडिशन राऊंड सुरु आहे. या सीझनमध्येही नेहा कक्कर, विशाल ददलानी आणि अनु मलिक परिक्षकाच्या भूमिकेत आहेत. तूर्तास ‘इंडियन आयडल 11’ची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होते. ती का तर नेहा कक्कर हिच्या इमोशन्समुळे. होय, ऑडिशन राऊंडमध्ये नेहा वेळोवेळी इमोशनल होताना दिसतेय. सध्या  सोशल मीडियावर तिच्या या ‘इमोशन्स’ची चर्चा आहे. इतकी की, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडतोय.
नुकताच अभिनाश नावाचा एक अंध स्पर्धक ‘इंडियन आयडल 11’च्या ऑडिशनसाठी पोहोचला. या अंध स्पर्धकाच्या संपूर्ण चेहरा जळालेला होता.  गाणे सुरु करण्यापूर्वी  चेहरा का जळाला?असा प्रश्न परीक्षकांनी विचारला. त्यावर अभिनाशने अंध असल्यामुळे स्वत:ला जाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. ते ऐकून नेहा भावूक इतकी भावूक झाली की ढसाढसा रडली. सोनी वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. या व्हिडीओनंतर नेहाच्या रडण्यावरचे एकापेक्षा एक भन्नाट मीम्स व्हायरल झालेत.  हे मीम्स पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. पाहा तर...
 

इंडियन आयडॉल 10 नंतर नेहा ब्रेकअपमुळे चर्चेत आली होती. तिचे आणि अभिनेता हिमांश कोहली यांचे ब्रेकअप कधी नव्हे इतके गाजले होते. या ब्रेकअपनंतर नेहा सैरभैर झाली होती. साहजिकच  या दु:खातून सावरायला तिला बराच वेळ लागला. पण आता ती यातून पूर्णपणे बाहेर पडली आहे.


Web Title: neha kakkar gets emotional On the indian idol set memes viral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.