नेहा कक्कर Neha Kakkar  आणि रोहनप्रीत सिंग Rohanpreet singh  लग्नाच्या बेडीत अखेर आज (शनिवारी)अडकले आहेत. दोघांच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या हळदीपासून ते रिंग सेरेमनीपर्यंत अनेक फोटो व्हायरल झाले होते.

दिल्लीतील गुरुव्दारामध्ये नेहा आणि रोहनप्रीतचे लग्न झाले. लग्नाच्यावेळी नेहाने पीच रंगचा लहंगा परिधान केलेला दिसतोय. तर रोहनप्रीतने सुद्धा त्याच रंगाची शेरवानी घातली आहे. वधूच्या गेटअपमध्ये नेहा खूपच सुंदर दिसतेय तर शेरवानीमध्ये रोहनप्रीत सुद्धा हँडसम दिसतोय.

लग्नाला नेहा आणि रोहनप्रीतचे जवळचे नातेवाईकच उपस्थित होते. रोहनप्रीत आणि नेहाचे लग्न दिल्लीत झाले असले तरी ते पंजाबमध्ये ही रिसेप्शन देणार आहेत. शुक्रवारी (काल) नेहाच्या हळदेची समारंभ पार पडला.  २० ऑक्टोबरला नेहा आणि रोहनची रोका सेरेमनी पार पडली. दोन दिवसांपूर्वी नेहा आपल्या कुटुंबीयांसोबत दिल्लीला पोहोचली.  


कोण आहे रोहनप्रीत सिंग?
गेल्या काही दिवसांपासून नेहा व रोहनप्रीतच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.  रोहनप्रीत सिंहचे नाव तुम्ही याआधीही ऐकले असेलच.

‘इंडियाज् राईझिंग स्टार 2’ या म्युझिक रिअ‍ॅलिटी शोमध्ये तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता आणि या शोचा तो फर्स्ट रनरअप होता. याशिवाय ‘मुझसे शादी करोगे’ या वेडिंग रिअ‍ॅलिटी शोमध्येही तो सहभागी झाला होता. नेहा व रोहनप्रीत खूप जुने मित्र आहेत. अलीकडे दोघेही एका म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र दिसले होते.   

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Neha kakkar and rohanpreet get wedding hitched in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.