ठळक मुद्दे‘मणिकर्णिका’नंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेने अद्याप कुठलाही चित्रपट साईन केलेला नाही. पण म्हणून अंकिताची चर्चा कमी नाही.

‘नागिन’ ही मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. या मालिकेची लोकप्रियता पाहता या मालिकेचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या सीझनला देखील प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि आता या मालिकेचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तूर्तास ‘नागिन 4’बद्दल वेगवेगळी माहिती समोर येत आहे. साहजिकच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  नवी बातमीही तेवढीच इंटरेस्टिंग आहे. होय, स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, या मालिकेत अंकिता लोखंडेची वर्णी लागली आहे.


निया शर्माचे नाव आधीच या मालिकेसाठी फायनल झाले आहे. तर दुस-या ‘नागिन’साठी अंकिताला साईन करण्यात आले आहे. अर्थात अद्याप याबद्दलची अधिकृत घोषणा झालेली नाही.
यापूर्वी अंकिताने एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत काम केलेय. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. या मालिकेने अंकिताला एक वेगळी ओळख दिली होती. या मालिकेनंतर एकता व अंकिताने कुठल्याच मालिकेत एकत्र काम केले नाही.  

अलीकडे कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका’ या चित्रपटात अंकिताने झलकारीबाईची भूमिका साकारली होती. हा अंकिताचा पहिला बॉलिवूड सिनेमा होता. पण आता अंकिता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतणार आहे. साहजिकच तिच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
‘मणिकर्णिका’नंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेने अद्याप कुठलाही चित्रपट साईन केलेला नाही. पण म्हणून अंकिताची चर्चा कमी नाही. सध्या ती  तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. अंकिता व विकी जैन या दोघांचा रोमान्स अगदी जोरात सुरु आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता काही काळ सिंगल होती. याचदरम्यान  विकी जैन याने तिच्या आयुष्यात एन्ट्री घेतली. विकी  जैनचा बॉलिवूडशी संबध नाही. तो एक उद्योगपती आहे. तो बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा को-ओनर आहे.

Web Title: naagin 4 ankita lokhande to be next naagin in ekta kapoors tv show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.