Video: 'मन उडू उडू झालं'च्या शीर्षकगीतावर मुंबईच्या रिक्षाचालकांनी धरला अफलातून ताल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 06:36 PM2021-09-16T18:36:03+5:302021-09-16T18:41:03+5:30

Man udu udu zalaya: 'मन उडू उडू झालं' ही मालिका चांगलीच लोकप्रिय होत असून घराघरात तिची चर्चा सुरु झाली आहे.

mumbais rickshawwalas catch the rhythm on the title song of man udu udu zalaya | Video: 'मन उडू उडू झालं'च्या शीर्षकगीतावर मुंबईच्या रिक्षाचालकांनी धरला अफलातून ताल

Video: 'मन उडू उडू झालं'च्या शीर्षकगीतावर मुंबईच्या रिक्षाचालकांनी धरला अफलातून ताल

Next
ठळक मुद्देसलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं अवधुत गुप्ते आणि आर्या आंबेकर यांनी गायलं आहे.

छोट्या पडद्यावर सध्या अनेक नवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळत आहे. अलिकडेच झी मराठीवर ५ नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. यामध्येच 'मन उडू उडू झालं' ही मालिका चांगलीच लोकप्रिय होत असून घराघरात तिची चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे स्त्री वर्गामध्ये लोकप्रिय असलेल्या या मालिकेची भुरळ आता पुरुषांनाही पडू लागली आहे. त्यामुळेच मुंबईतील काही रिक्षाचालकांनी चक्क या मालिकेच्या शीर्षकगीतावर ताल धरला आहे. सध्या  यारिक्षाचालकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं अवधुत गुप्ते आणि आर्या आंबेकर यांनी गायलं आहे. विशेष म्हणजे उडत्या चालीचं हे गाणं ऐकल्यावर आपोआप अनेकांची पावलं थिरकू लागतात. त्यामुळेच या गाण्यावर ताल धरण्याचा मोह मुंबईतील रिक्षाचालकांनाही आवरु शकला नाही.

दरम्यान, या मालिकेचं दिग्दर्शन मंदार देवस्थळी यांनी केलं असून या मालिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत मुख्य भूमिकेत झळकले आहेत. 
 

Web Title: mumbais rickshawwalas catch the rhythm on the title song of man udu udu zalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app