मोनालिसाने केले बाथटबमध्ये फोटोशूट, दाखवल्या मादक अदा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 06:30 AM2020-01-04T06:30:00+5:302020-01-04T06:30:00+5:30

मोनालिसाचे खरे नाव अंतरा बिस्वास आहे. २००८ मध्ये ‘भोले शंकर’ या भोजपुरी सिनेमातून तिने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. तिने आतापर्यंत १२५ पेक्षा अधिक भोजपुरी सिनेमांमध्ये काम केले आहे.

Monalisa Sets The Internet on Fire With Her Sensuous Bathtub Photoshoot. | मोनालिसाने केले बाथटबमध्ये फोटोशूट, दाखवल्या मादक अदा

मोनालिसाने केले बाथटबमध्ये फोटोशूट, दाखवल्या मादक अदा

googlenewsNext

चर्चेत राहण्यासाठी बोल्ड फोटोशूट करणे आता काही नवीन नाही. त्यातल्या त्यात ते फोटोशूट  अगदी हॉट असेन तर   सोशल मीडियावर त्याची लगेच चर्चा होणार हे मात्र नक्की.   सोशल मीडियावर सध्या अनेक अभिनेत्री  अॅक्टिव्ह असतात. इथं या अभिनेत्री आपल्या फॅन्सशी संवाद साधत असतात. शिवाय सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओसुद्धा शेअर करत असतात. अशीच एक अभिनेत्री जिने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो तुम्हालाही नक्कीच वेड लावल्याशिवाय राहणार नाही. ती आहे भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा. 


 तिने बाथटबमध्ये फोटोशूट केले आहे. फोटोत मोनालिसाच्या  सेक्सी अदा आणि बोल्ड तसंच हॉट अंदाज तुम्हाला घायाळ करेल. बाथटबमध्ये बसून सेक्सी पोज दिलेला हा मोनालिसाचा फोटो सध्या तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे.


मोनालिसाचे खरे नाव अंतरा बिस्वास आहे. २००८ मध्ये ‘भोले शंकर’ या भोजपुरी सिनेमातून तिने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. तिने आतापर्यंत १२५ पेक्षा अधिक भोजपुरी सिनेमांमध्ये काम केले आहे. परंतु बिग बॉसच्या सीजन १० मुळे तिच्या करिअरला एक वेगळीच कलाटणी मिळाली होती. या शोमधूनच तिला तुफान लोकप्रियता मिळाली आहे. मोनालिसाने शोच्या दरम्यान तिचा बॉयफ्रेन्ड विक्रांत सिंग राजपूतसोबत लग्न केले होते. अनेकांनी मोनालिसाच्या या लग्नाला पब्लिसिटी स्टंट ठरवले होते. पण मोनालिसा व विक्रांतचे हे लग्न केवळ ‘बिग बॉस’चा टीआरपी वाढवण्यासाठी नव्हते तर त्यांनी खरोखरीच प्रेक्षकांना साक्षी मानत लग्न केले होते.

Web Title: Monalisa Sets The Internet on Fire With Her Sensuous Bathtub Photoshoot.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.