ठळक मुद्देमोनाचा एक न्यूड एमएमएस सोशल मीडियावर लीक झाला होता. पण या व्हिडिओतील मुलगी ही मोना नसून हा व्हिडिओ मॉर्फ करण्यात आला असल्याचे तिचे म्हणणे होते.

मोना सिंगने जस्सी जैसी कोई नही या मालिकेद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली. या मालिकेतील तिचा लूक खूपच वेगळा होता. दाताला तारा लावणारी, अतिशय साधी हेअर स्टाईल करणारी, नेहमीच पंजाबी ड्रेस घालणारी ही जस्सी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. मोना या मालिकेच्या दरम्यान कोणत्याही पुरस्कार सोहळ्याला अथवा खाजगी ठिकाणी देखील याच गेटअपमध्ये हजेरी लावत असे. 

जस्सी जैसी कौई नही ही मालिका सुरू असताना जस्सीची भूमिका साकारणारी मोना खऱ्या आयुष्यात कशी दिसते हे कोणालाच माहीत नव्हते. या कार्यक्रमात तिचा मेकओव्हर झाला आणि ही मोना कशी दिसते हे प्रेक्षकांना कळले. या मालिकेनंतर मोनाने क्या हुआ तेरा वादा, प्यार को हो जाने दो, कवच... काली शक्तीयों की यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. थ्री इडियट या चित्रपट देखील ती झळकली होती.

मोना एका कोन्ट्रॉव्हर्सीमुळे काही वर्षांपूर्वी चर्चेत आली होती. तिचा एक न्यूड एमएमएस सोशल मीडियावर लीक झाला होता. पण या व्हिडिओतील मुलगी ही मोना नसून हा व्हिडिओ मॉर्फ करण्यात आला असल्याचे तिचे म्हणणे होते. तिने याबाबत टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले होते की, मी माझ्या क्या हुआ तेरा वादा या मालिकेचे चित्रीकरण करत असताना माझ्या काही मित्रमैत्रिणींनी मला याविषयी सांगितले. मी क्षणाचाही विलंब न करता चित्रीकरणाच्या ठिकाणाहून निघाले आणि मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम ब्रांचला जाऊन तक्रार दाखल केली. हा व्हिडिओ मॉर्फ व्हिडिओ असून मी याबाबत पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. अशाप्रकारची कृत्य करण्याआधी लोकांनी हे लक्षात ठेवावे की, आम्ही अभिनेत्री असण्याआधी एक स्त्री आहोत आणि आम्हाला देखील आमच्या कुटुंबियांना, मित्रमैत्रिणींना उत्तरं द्यावी लागतात.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mona Singh was in MMS scandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.