Mona Singh MMS Vidoe Shocked Entire Tv Industry | MMS लिक झाल्याने नैराश्यात गेली होती 'ही' अभिनेत्री, अशी झाली होती अवस्था
MMS लिक झाल्याने नैराश्यात गेली होती 'ही' अभिनेत्री, अशी झाली होती अवस्था


‘जस्सी जैसी कोई नही’ या मालिकेतून भरघोस प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री मोना सिंगने आपल्या भूमिकेने रसिकांचे मनोरंजन केले. या मालिकेमुळे लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रींच्या यादीत मोना सिंग गणली जाते. मालिके नंतर मोनाला सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. ‘थ्री इडियट्स’, ‘झेड प्लस’ आणि ‘उटपटांग’ या चित्रपटांमध्ये मोनाने काम केले आहे. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुकही झाले. 

याचदरम्यान खाजगी कारणामुळे मोना नैराश्यात गेली होती. २०१३ मध्ये मोनाचा एक अश्लिल एमएमएस समोर आला होता. या एमएमएसमुळे तिच्यावर जोरदार टीकाही झाली.  हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ती नैराश्यामध्ये गेल्याच्या चर्चा सुरु होत्या. काही दिवसांमध्येच मोनाने हा व्हिडीओ फेक असल्याचा म्हटले होते. कुणाच्या तरी शरीरावर माझा फोटो चिटकवून माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे तिने स्पष्टीकरण दिले होते.


काही दिवसांपूर्वी मोना विवाह बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात होते. या तरुणाविषयी अद्याप अधिक माहिती समोर आली नसून हे दोघे गेल्या वर्षभरापासून एकमेकांना डेट करत असल्याचे कळतय. याआधी मोना ‘बँड ऑफ बॉइज’ फेम अभिनेता करण ओबेरॉयला डेट करत होती. करणशी ब्रेकअप झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालशीही तिचे नाव जोडले गेले होते.
 


Web Title: Mona Singh MMS Vidoe Shocked Entire Tv Industry
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.