अभिनेत्री मोहिना कुमारी सिंग आता लग्नबेडीत अडकणार आहे. मोहिना उत्तराखंडचे पर्यटन मंत्री व अध्यात्मिक गुरू सतपाल महाराज यांची सून बनणार आहे. ती सतपाल महाराज यांचा छोटा मुलगा सुयश रावकसोबत सात फेरे घेणार आहे. लग्नाच्या सगळ्या विधी उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये होणार आहे. या लग्नाला भव्य बनवण्यासाठी सतपाल महाराज यांनी कोणतीही कसर सोडलेली नाही. या विवाह सोहळ्यात त्यांच्या जवळचे नातेवाईक व मित्रमंडळी उपस्थित राहणार आहेत. इतकंच नाही तर परदेशातील पाहुणी मंडळीदेखील या लग्नसोहळ्यासाठी भारतात आले आहेत. मोहिना स्वतः राजघराण्याशी संबंधीत आहे. 


अभिनयापूर्वी मोहिना रिएलिटी शो 'डांस इंडिया डांस'मध्ये दिसली होती. या शोमध्ये मोहिना कोरियोग्राफर टेरेंस लुईसच्या टीममध्ये होती. त्यानंतर तिने अभिनयातील कारकीर्दीला सुरूवात केली. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत मोहिनाने किर्ती सिंघानियाची भूमिका केली होती. मोहिनाने टेलिव्हिजन इंडस्ट्रीशिवाय चित्रपटातही काम केलं आहे. ती रेमो डिसूझाचा चित्रपट 'एबीसीडी: एनी बडी कैन डांस'मध्ये झळकली होती.


मोहिना राजेशाही कुटुंबातील संबंधीत आहे. ती मध्यप्रदेशमधील रिवा येथील राजकुमारी आहे. मोहिना महाराजा पुष्पराज सिंग जूदेव यांची मुलगी आहे आणि ती रॉयल जीवन जगते.

मोहिनाने यावर्षी ८ फेब्रुवारी सुयशसोबत साखरपुडा केला होता. साखरपुड्याचा रितीरिवाज रिवामध्ये झाला होता. ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मोहिनाने बॅचरल पार्टीचं आयोजन केलं होतं. ही पार्टी एम्सटर्डममध्ये ठेवली होती.


लग्नात मोहिनाने सब्यसाचीने डिझाईन केलेले कपडे परिधान केले. या कपड्यांना खास राजपूती टच देण्यात आला आहे. एका एण्टरटेन्मेंट वेबसाईटशी मोहिनाने सांगितलं होतं की, मी माझ्या आजी व आईचे फोटो पाहून मोठी झाली आहे. लग्नातच नाही तर बाकी फंक्शनमध्ये रॉयल आऊटफिट्स परिधान करणार आहे.


लग्नानंतर मोहिना अभिनय करियरला रामराम करणार आहे. तिने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना मोहिनाने सांगितलं की, लग्नानंतर मी मुंबई आणि अभिनय दोन्ही सोडणार आहे. माझे जीवन १८० डिग्रीमध्ये बदलणार आहे. मी आनंदी होण्यासोबत थोडीशी त्रस्तदेखील आहे. टेलिव्हिजन इंडस्ट्री सोडण्याचा माझा निर्णय काही फ्रेंड्सना योग्य वाटला नाही. पण, मी नेहमी माझ्या मनाचं ऐकते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mohena Singh Rewa Princess And Actress Today Royal Wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.