ठळक मुद्देमोहन जोशी यांनी आजवर अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

अग्गंबाई सासूबाई या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या मालिकेतील बबड्या, शुभ्रा, आसावरी, अभिजीत, आजोबा या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडतात. आजोबांच्या व्यक्तिरेखेत आपल्या ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांना पाहायला मिळाले होते. पण रवी पटवर्धन यांचे काही दिवसांपूर्वी अचानक निधन झाले. सोम्या कोंबडीच्या, चप्पलचोर अशी बोलण्याची त्यांची स्टाईल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत होती. 

अग्गंबाई सासूबाई या मालिकेचे फॅन्स आजोबांना प्रचंड मिस करत आहेत. त्यामुळे आजोबांची व्यक्तिरेखा आपल्याला पुन्हा एकदा या मालिकेत पाहायला मिळणार आहे. रवी पटवर्धन यांच्या अभिनयामुळे आजोबांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता या भूमिकेत आपल्याला ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना पाहायला मिळणार आहे. मोहन जोशी यांची ४ जानेवारीला या मालिकेत एंट्री होणार आहे. 

रवी पटवर्धन यांचे ६ डिसेंबरला निधन झाले. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. म्हणून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. मार्चमध्येही त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. रवी पटवर्धन यांनी मराठी नाटके आणि मराठी चित्रपटांसह मालिकांमध्येही काम केले होते. भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक चांगल्याप्रकारे खुलून दिसत असे. त्यांनी दीडशेहून अधिक नाटकांत आणि २०० हून अधिक चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत. 

मोहन जोशी यांनी आजवर अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. बॉलिवूडमध्ये त्यांनी खलनायक म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कलर्स मराठीवरील जीव झाला येडापिसा या मालिकेत सध्या ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: mohan joshi will replace ravi patwardhan in aggabai sasubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.