This is Mohabbate Fame Diwali's Tripathi | ​ये है मोहोब्बते फेम दिव्यांका त्रिपाठी या कारणामुळे फुकेटला झाली रवाना
​ये है मोहोब्बते फेम दिव्यांका त्रिपाठी या कारणामुळे फुकेटला झाली रवाना
ये है मोहोब्बते ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील इशिता ही व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहे. या मालिकेत इशिताची भूमिका साकारणारी दिव्यांका त्रिपाठी तर प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. दिव्यांकाने याच मालिकेत अभिषेकची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या विवेक दहियासोबत २०१५ मध्ये लग्न केले. त्या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. त्या दोघांनी नच बलिये या कार्यक्रमात भाग घेतला होता आणि या कार्यक्रमाचे विजेतेपद देखील त्यांनी मिळवले होते. 
दिव्यांका आणि विवेक त्यांच्या मालिकेच्या चित्रीकरणात कितीही व्यग्र असले तरी ते एकमेकांसाठी नेहमीच वेळ काढतात. ते त्यांच्या वाढदिवसासाठी, लग्नाच्या वाढदिवाच्या सेलिब्रेशनसाठी नेहमीच कुठे ना कुठे जात असतात. आता दिव्यांका त्रिपाठीचा १४ डिसेंबरला वाढदिवस असून हा वाढदिवस त्या दोघांनी धुमधडाक्यात साजरा करायचे ठरवले आहे आणि या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी ते फुकेटला रवाना झाले आहेत. दिव्यांकानेच ही गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना सांगितली आहे. दिव्यांकाने तिचा आणि विवेकचा टूकटूक गाडीतील एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे आणि त्यात तिने लिहिले आहे की, आम्ही दोघे फूकेट मध्ये असून टूकटूक गाडीने फिरत आहोत. आम्ही आमची ही ट्रीप खूपच एन्जॉय करत आहोत. 
दिव्यांकाची ये है मोहोब्बते या मालिकेतील इशिताची भूमिका रसिकांना प्रचंड आवडली होती. तिला प्रेक्षक इशी माँ म्हणूनच ओळखतात. मात्र रसिकांची लाडकी इशी माँ म्हणजेच दिव्यांका त्रिपाठीने नुकतीच या मालिकेतून एक्झिट घेतली. मालिकेत इशी माँ म्हणजेच दिव्यांकाचा अपघाती मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले आहे. हे सगळे मालिकेच्या कथानकाचा भाग असल्याचे दाखवले जात असले तरी दिव्यांकाच्या एक्झिटमागे वेगळेच कारण असल्याचे समोर येत आहे. यामागे कोणता वाद कारणीभूत आहे असा तुम्ही विचार करत असाल तर तोही चुकीचा आहे. कारण दिव्यांकाच्या एक्झिटमागे एक गोड कारण असल्याचे समोर येत आहे. दिव्यांका लवकरच आई बनणार असल्याने तिने ही मालिका सोडली असल्याची जोरदार चर्चा आहे. 

Also Read : का दिव्यांका त्रिपाठीने मारली विवेक दहियाच्या कानाखाली?

Web Title: This is Mohabbate Fame Diwali's Tripathi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.