A mobile phone stolen a month ago was found, bharat ganeshpur salute to mumbai police | महिनाभरापूर्वी चोरी गेलेला मोबाईल सापडला, भारत गणेशपुरेंनी मुंबई पोलिसांना ठोकला सलाम

महिनाभरापूर्वी चोरी गेलेला मोबाईल सापडला, भारत गणेशपुरेंनी मुंबई पोलिसांना ठोकला सलाम

'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता भारत गणेशपुरे यांचा ऑगस्ट महिन्यात मोबाईल चोरीला गेला होता. चोरीला गेलेला मोबाईल भारत गणेशपुरे यांना परत मिळाला आहे. याची माहिती त्यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. या व्हिडीओमधून भारत गणेशपुरे यांनी मुंबई पोलिसांचे जाहिर आभार मानले आहेत. मुंबई पोलिसांच्या अथव परिश्रमामुळे आपल्याला मोबाईल परत मिळाल्याचे भारत गणेशपुरे या व्हिडीओ म्हणतायेत. 

भारत काय म्हणाले व्हिडीओत 
भारत गणेशपुरे म्हणातायेत, 'मुंबई पोलिसांबाबत कोणी काहीही म्हणो पण मी मुंबई पोलिसांना सलाम करतो. मी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल घ्यायला गेलो तेव्हा मला कळलं की, त्यांनी साधारण 350 जणांचे मोबाईल चोरांकडून हस्तगत केले आहेत. . दरमहिन्याला त्यांची ही मोहीम सुरु असते. आपल्याला माहिती नाही रात्री पोलीस किती काम करतात आपण नेहमीच पोलिसांना नाव ठेवत असतो. करोनाच्या या कठीण काळात ही मुंबई पोलिसांना प्रचंड तणाव असाताना सुद्धा सगळ्यांना मुंबई पोलीस उत्कृष्ठ काम करतायेत. धन्यवाद, तुम्हा सगळ्यांना मनापासून सलाम.' 


कसा गेला होता मोबाईल चोरीला 

ऑगस्ट महिन्यात मुंबईत आणि  उपनगरांमध्ये पावसाने सगळ्यांचीच दाणादाण उडाली होती. अनेकांना या पावसाचा फटका बसला होता. लोक अडकून पडले होते, अनेक वस्त्या जलमय झाल्या होत्या. रस्तेच नव्हे तर रस्त्यांवरील वाहने पाण्यात बुडाली होती. अशात ‘चला हवा येऊ द्या’ फेम भारत गणेशपुरे यांना अतिशय वाईट अनुभव आला होता.  पावसामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या गणेशपुरेंचा मोबाईल फोन दोन भामट्यांनी लंपास केला होता. याची माहिती गणेशपुरे यांनी फेसबुकला व्हिडीओ शेअर करत दिली होती. ते म्हणाले होते. ‘माझा मोबाईल अक्षरक्ष: लुटून नेला. ही घटना वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर कांदवलीजवळ घडली होती. खूप पाऊस होता.  दरड कोसळल्यामुळे खूप ट्रॅफिक होते,’ असे सांगत ही घटना नेमकी कशी घडली याची सविस्तर  व्हिडीओतून दिली होता.
 

 

तुम्हाला कुणी निर्दयी म्हटले तरी चालेल...

कोरोनामुळे फार विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थिती तुमच्या गाडीमध्ये सेंटर लॉक असेल तर आधी गाडी लॉक करा. काच उघडू नका. तुम्हाला कुणी निर्दयी म्हटले तरी चालेल. दिवस सध्या वाईट आहेत. याच्यामध्ये बायका, लहान मुले असतात. त्यांच्याकडून-मागची खिडकी उघडी आहे, गाडीच्या समोर स्पार्क होत आहे किंवा मागच्या टायरमध्ये हवा नाही आहे, असे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न या टोळीकडून केला जाईल. पण गाडीतून तुम्ही उतरू नका. काळजी घ्या. माझा मोबाइल माझ्या मुर्खपणामुळे या टोळीने लुटून नेला आहे, असे त्यांनी व्हिडीओत म्हटले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: A mobile phone stolen a month ago was found, bharat ganeshpur salute to mumbai police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.