Shocking! ‘इंडियन आयडल’ची माजी स्पर्धक अमिका शैलने केली सिंगींग रिअ‍ॅलिटी शोची पोलखोल 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 03:28 PM2021-05-14T15:28:11+5:302021-05-14T15:35:18+5:30

Singing Reality Shows : सिंगर व अ‍ॅक्ट्रेस अमिका शैलचे रिअ‍ॅलिटी शोबद्दल धक्कादायक खुलासे, काय म्हणाली वाचा...

mirzapur fame amika shail exposes indian idol and other singing reality shows-says-they-are-fake-and-scripted/a | Shocking! ‘इंडियन आयडल’ची माजी स्पर्धक अमिका शैलने केली सिंगींग रिअ‍ॅलिटी शोची पोलखोल 

Shocking! ‘इंडियन आयडल’ची माजी स्पर्धक अमिका शैलने केली सिंगींग रिअ‍ॅलिटी शोची पोलखोल 

Next
ठळक मुद्देअमिका ही अभिनेत्री व गायिका आहे. गायिका म्हणून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 9 वर्षाची असताना तिने ‘लिटिल चॅम्प’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेतला.

टीव्हीवरचे रिअ‍ॅलिटी शो स्क्रिप्टेड (Singing Reality Shows) असतात, हा आरोप तसा जुना. आता हा आरोप नव्याने होतोय. निमित्त आहे, ‘इंडियन आयडल 12’ (Indian Idol 12) या सिंगींग रिअ‍ॅलिटी शोचे. या शोच्या ‘किशोर कुमार स्पेशल एपिसोड’वर प्रेक्षकांनी सडकून टीका केली होती. त्यातच या एपिसोडमध्ये स्पेशल गेस्ट म्हणून गेलेले किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनीही ‘इंडियन आयडल 12’ची पोलखोल केली होती. शूटींगआधीच मला सर्व स्पर्धकांची भरभरून प्रशंसा करण्यास सांगण्यात आले होते, असे सांगून अमित कुमार यांनी ‘इंडियन आयडल 12’मधील हवा काढली होता. आता सिंगर व अ‍ॅक्ट्रेस अमिका शैल (Amika Shail) हिनेही रिअ‍ॅलिटी शोबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. रिअ‍ॅलिटी शो नावाला रिअ‍ॅलिटी शो असतात. सर्वं काही आधीच ठरलेले असते, असा आरोप तिने केला आहे.

ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले, ‘मला या रिअ‍ॅलिटी शोचे सत्य माहितीये. इंडियन आयडल, व्हॉईस इंडिया आणि अन्य रिअ‍ॅलिटी शोमध्ये मी भाग घेतला होता. शोमध्ये स्पर्धक येतात, लोकप्रिय होतात आणि नंतर गायब होतात. याचे कारण एकच आहे, ते म्हणजे हे शो स्क्रिप्टेड असतात. जे काही दाखवले जाते, ते फार काही सत्य नसते. हा फक्त ड्रामा असतो आणि या भरवशावर त्यांना व्ह्यूज मिळतात. स्पर्धकांच्या आयुष्याचा बाजार मांडून सहानुभूती व टीआरपी लाटण्याचे प्रकार येथे सर्रास घडतात.’


 
आधी चौकशी करतात, मग फोकस
रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी स्पर्धकांची आधी सखोल चौकशी होते. त्यांचे कौटुंबिक मुद्दे, आर्थिक स्थिती याबद्दल माहिती काढली जाते आणि नंतर त्यावर फोकस केला जातो. ज्यांना स्पर्धकांना जास्त वोट मिळतात, त्यांना प्रमोट केले जाते. शो संपला की, या स्पर्धकांशी कुणालाही देणेघेणे उरत नाही. जजेसही त्यांच्याकडे ढुंकून पाहत नाहीत. शो सुरु असेपर्यंत वोट मिळणा-या स्पर्धकांना महत्त्व दिले जाते. पुढे त्यांना कुठलाही फिल्ममेकर काम देत नाही, असे अमिका म्हणाली.

कोण आहे अमिका
अमिका ही अभिनेत्री व गायिका आहे. गायिका म्हणून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 9 वर्षाची असताना तिने ‘लिटिल चॅम्प’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेतला. पुढे तिने अ‍ॅक्टिंगकडे मोर्चा वळवला. उडान, लाल इश्क, बालवीर रिटर्न्स अशा मालिकांमध्ये ती झळकली. यानंतर ‘नागिन’मध्ये ती दिसली़ पुढे मिर्झापूर व गंदी बात या वेबसीरिजमध्येही झळकली. अमिकाला वेबसीरिजमध्ये काम करणे आवडते़ तिच्या मते, वेबसीरिज प्रॅक्टिकल असतात. इथे तुम्हाला तुमचे टॅलेंट दाखवण्याची पूर्ण संधी मिळते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: mirzapur fame amika shail exposes indian idol and other singing reality shows-says-they-are-fake-and-scripted/a

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app