ठळक मुद्देयेत्या आठवड्यात माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार, येत्या आठवड्यात माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. अभिजीत खांडकेकर, इशा केसकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. गेल्या आठवड्यात देखील ही मालिका पहिल्या क्रमांकावर होती. राधिका आणि सौमित्रचा विवाह झाल्यापासून प्रेक्षक पुन्हा या मालिकेकडे वळले आहेत.

अग्गंबाई सासूबाई या मालिकेला ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार गेल्या आठवड्यात पहिल्या पाचमध्ये देखील स्थान मिळवता आलेले नव्हते. पण यंदाच्या आठवड्यात ही मालिका थेट दुसऱ्या क्रमांकावर असून या मालिकेचे कथानक प्रेक्षकांना चांगलेच आवडत असल्याचे दिसून येत आहे.

नुकतीच सुरू झालेली लग्नाची वाईफ वेडिंगची बायको ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. ही मालिका गेल्या कित्येक आठवड्यांपासून पहिल्या पाचमध्ये आहे.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेला नुकतीच तीन वर्षं पूर्ण झाली असून या मालिकेची लोकप्रियता इतक्या वर्षांत थोडी देखील कमी झालेली नाही. ही मालिका ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार चौथ्या क्रमांकावर आहे. या मालिकेत अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांची मुख्य भूमिका असून त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेने लीप घेतल्यानंतर तर या मालिकेची लोकप्रियता अधिकच वाढली.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार, येत्या आठवड्यात स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका पाचव्या क्रमांकावर आहे. या मालिकेची कथा तर प्रेक्षकांना आवडते. पण त्याचसोबत डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली संभाजी महाराज यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावते आणि त्याचमुळे या मालिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे.

चला हवा येऊ द्या या मालिकेला या आठवड्यात पहिल्या पाचमध्ये स्थान बनवता आलेले नाहीये. 


 

Web Title: Mazya Navryachi Bayko is number one as per Broadcast Audience Research Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.