'आई माझी काळुबाई'नंतर अलका कुबल नव्या भूमिकेत; लोकप्रिय कार्यक्रमात लावणार हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 04:45 PM2021-10-13T16:45:03+5:302021-10-13T16:45:58+5:30

Alka Kubal : 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मध्ये स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी अलका कुबल सहभागी होणार आहेत. त्यांच्यासोबत प्रेरणादायी बीजमता राहीबाई पोपेरे यादेखील मंचावर उपस्थित राहणार आहेत.

marathi tv show sa re ga ma pa little champs alka kubal | 'आई माझी काळुबाई'नंतर अलका कुबल नव्या भूमिकेत; लोकप्रिय कार्यक्रमात लावणार हजेरी

'आई माझी काळुबाई'नंतर अलका कुबल नव्या भूमिकेत; लोकप्रिय कार्यक्रमात लावणार हजेरी

Next
ठळक मुद्देसारेगमप लिटिल चॅम्प्स' हा तमाम महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा आणि संगीत प्रेमींचा अगदी लाडका कार्यक्रम आहे.

अलका कुबल हे नाव कोणत्याही मराठी प्रेक्षक रसिकवर्गासाठी नवीन नाही. उत्तम अभिनयाच्या जोरावर अलका कुबल यांनी संपूर्ण कलाविश्व गाजवलं आहे. असंख्य चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर अलका कुबल (Alka Kubal)  यांनी त्यांचा मोर्चा छोट्या पडद्यावरा वळवला आहे. अलिकडेच त्यांची 'आई माझी काळुबाई' ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. विशेष म्हणजे अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. या मालिकेच्या यशानंतर अलका कुबल लवकरच 'सा रेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमाच्या मंचावर हजेरी लावणार आहेत. 

'सारेगमप लिटिल चॅम्प्स' हा तमाम महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा आणि संगीत प्रेमींचा अगदी लाडका कार्यक्रम आहे. त्यातील सर्व निरागस स्पर्धकांइतकाच गोड त्यांचा परफॉर्मन्स असतो. फक्त परीक्षक आणि प्रेक्षकच नाही तर मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारदेखील या छोट्या गायकांचे फॅन झाले आहेत. या आठवड्यात नवरात्रीचा उत्साह कायम ठेवत सर्व स्पर्धक देवीला समर्पित करणारी गाणी सादर करणार आहेत. त्यामुळेच या स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी अलका कुबल सहभागी होणार आहेत. इतकंच नाही तर त्यांच्यासोबत प्रेरणादायी बीजमता राहीबाई पोपेरे यादेखील मंचावर उपस्थित राहणार आहेत.

'या' अभिनेत्री होणार सहभागी

अलका कुबल आणि प्रेरणादायी बीजमता राहीबाई पोपेरे यांच्यासोबत छोट्या पडद्यावरील काही लोकप्रिय अभिनेत्रीदेखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यात प्रार्थना बेहेरे, अन्विता फलटणकर, ऋता दुर्गुळे, श्वेता राजन, कुंजिका काळविण्ट, तन्वी कुलकर्णी, वैष्णवी करमरकर या अभिनेत्रींचा समावेश असेल.

दरम्यान, 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'च्या मंचावर या अभिनेत्रींसोबत चिमुकले कलाकार खूप धमाल करणार आहेत. इतकंच नाही तर या चिमुकल्यांच्या गाण्यावर या अभिनेत्री ठेकादेखील धरणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सोबतच या विशेष भागात परफॉर्मर ऑफ द वीक कोण ठरेल? गोल्डन तिकीट कोणाला मिळेल? आणि या मंचावरील कुठल्या स्पर्धकांचा प्रवास संपेल? या मागचं कोड लवकरच प्रेक्षकांना उलगडणार आहे. 
 

Web Title: marathi tv show sa re ga ma pa little champs alka kubal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app