ठळक मुद्देश्वेताचा पती हरमित स्टाइलिस्ट आहे आणि एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा मालक आहे. याशिवाय दोघांचे गोव्यात एक रेस्टॉरंट आहे.

बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री बोल्ड म्हणून ओळखल्या जातात. अगदी रिल लाईफमध्येच नाही तर रिअल लाईफमध्येही त्यांचा बोल्डनेस चर्चेचा विषय ठरतो. पण म्हणून मराठी अभिनेत्रींच्याही बोल्डनेसच्या चर्चा कमी नाहीत. मराठीतल्या अनेक नट्या ख-या आयुष्यात एकदम बिनधास्त आहे. अभिनेत्री श्वेता साळवे हिचेच घ्या ना... बॉलिवूडच्या बोल्ड बालांना लाजवेल असा फोटो श्वेताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
होय, पतीला चक्क किस करतानाचा फोटो तिने पोस्ट केला आहे. फोटोत ती पती हरमित सेठीचे चुंबन घेतय. सध्या तिचा हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

श्वेताने 2008 साली हरमितला डेट करणे सुरु केले होते. यानंतर 2012 साली हरमित सेठीसोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर चार वर्षांनी दोघांना मुलगी झाली़ तिचे नाव आर्या आहे.

श्वेताने प्रेग्नंसीत केलेले बिकिनी फोटोशूटही असेच गाजले होते. श्वेताने हिप हिप हुर्रे, लेफ्ट राइट लेफ्ट, किटी पार्टी, कहानी किसी रोज अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. 

झलक दिखला जा या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सुद्धा ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. खतरों के खिलाडी या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सुद्धा ती दिसली होती. लग्नानंतर श्वेता छोट्या पडद्यापासून काहीसी दूर गेली. सोशल मीडियावर मात्र ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:चे अनेक बोल्ड व ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते.

श्वेताचा पती हरमित स्टाइलिस्ट आहे आणि एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा मालक आहे. याशिवाय दोघांचे गोव्यात एक रेस्टॉरंट आहे.
 
 

Web Title: marathi actress shweta salve shares her photo while kissing husband on social media-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.