छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त रिएलिटी शो 'बिग बॉस १३'मधून लोकप्रिय झालेला  असीम रियाज, एक उत्कृष्ट अभिनेता आणि मॉडेल आहे. त्याने शोमध्ये फर्स्ट रनर अपचे स्थान मिळवून मनोरंजन उद्योगात स्वतःचे वेगळे स्थान बनवले आहे. इथेपर्यंत पोहचवण्याचे श्रेय तो संगीता भाटिया यांना देतो. त्या तोएब मॅनेजमेंट कंपनीच्या फाउंडर आहेत.

संगीताचे आभार मानण्यासाठी असीमने बिग बॉसमध्ये जिंकलेले 'सुलतानी आखाडा मेडल' संगीताला भेट म्हणून दिले. 


असीम म्हणाला, हे मेडल तुमचे आहे, माझे मॉडेलिंग असाईंनमेंट, माझे करियर सर्व तुम्हाला समर्पित आहे. मी आता ज्या पदावर उभा आहे यामागे तुमची खरी मेहनत आणि परिश्रम आहे. तोएबने मला माझ्यापेक्षा चांगले समजले आणि मला प्रोत्साहित केले. मी प्रत्येक गोष्टीसाठी त्यांचा आभारी आहे .


आसीमने केलेले संगीता यांची प्रशंसा ऐकून त्यांना खूप आनंद झाला व त्यांनी असीमचे आभारही मानले. ती म्हणाली की, आज फॅशन जगात भारतीय चेहरे ओळखले जात आहेत आणि आम्ही सतत या दिशेने कार्य करीत आहोत.

नवीन चेहऱ्यांपासून प्रस्थापित चेहऱ्यापर्यंत मॉडेलिंग आणि मनोरंजनाच्या जगतामध्ये तोएबने काही उत्कृष्ट व्यक्तिमत्व सिनेइंडस्ट्रीला दिले आहेत.  

Web Title: The man who stood firmly in the back of Bigg Boss 13 Fame Aseem Riaz's career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.