Makers get real bridal jewellery from Jaipur for a scene on the show | ‘ये रिश्ता क्या कहलाता है!’तील एका प्रसंगासाठी निर्मात्यांनी जयपूरहून मागविले खरे दागिने
‘ये रिश्ता क्या कहलाता है!’तील एका प्रसंगासाठी निर्मात्यांनी जयपूरहून मागविले खरे दागिने

स्टार प्लस’वरीलये रिश्ता क्या कहलाता है!’ ही मालिका प्रदीर्घ कथानक, शक्तिशाली आणि लोकप्रिय व्यक्तिरेखा तसेच सुंदर वेशभूषा आणि उंची दागदागिने यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे. त्यातून कौटुंबिक मूल्यांचा संदेशही दिला जातो.

सध्याच्या कथा भागानुसार गोएंका कुटुंबियांना व्यवसायात झालेल्या मोठ्या तोट्यामुळे घरची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी नायरा (शिवांगी जोशी) ही नकली दागिन्यांच्या निर्मितीचा व्यवसाय सुरू करते. आपला पती कार्तिक (मोहसिन खान) याच्या खांद्याला खांदा लावून व्यवसाय यशस्वी करण्यासाठी काम करणारी सून असे नायराचे चित्रण यात करण्यात आले आहे. आता आपल्या परंपरेला जागण्यासाठी तसेच विश्वासार्हता कयम राखण्यासाठी निर्मात्यांनी मालिकेच्या एका प्रसंगासाठी खास जयपूरहून हाताने बनविलेले वधूचे खरे दागिने वापरले आहेत.


निर्मात्यांशी निकटचे संबंध असलेल्या सूत्रांनी सांगितले, “मालिकेतील व्यक्तिरेखा तरुण असो की म्हातारी, ती नेहमी शालीन, सुंदर कपडे आणि दागिने परिधान केलेलीच दिसेल, ही या मालिकेची परंपरा आहे. आतापर्यंत अनेकदा मालिकेतील कलाकारांनी वापरलेले दागिने हे खास त्यांच्यासाठीच बनविले जात असून त्यामुळे त्यांचे ग्लॅमर वाढते आणि ही मालिका अन्य कोणत्याही मालिकांपेक्षा वेगळी ठरते. आता या वैशिष्ट्यपूर्ण दागिन्यांचा स्तर आणखी उंचावण्यासाठी आगामी भागांसाठी निर्मात्यांनी जयपूरहून खास हातांनी घडविलेली वधूसाठीचे दागिने मागविले आहेत. मालिकेतील गोएंका कुटुंबीय हे मूळ राजस्थानचे असल्याने हे दागिने मुद्दाम जयपूरवरून मागविण्यात आले आहेत. मालिकेच्या आगामी भागांत हे ठसठशीत आणि देखणे दागिने पाहून प्रेक्षक थक्क तर होतीलच, पण कार्तिक आणि नायराच्या जीवनाला मिळणाऱ्या अनपेक्षित वळणांमुळे चकितही होतील.”


मालिकेत उच्चभ्रूपणा आणि भव्यता दर्शविताना निर्माते खर्चात हात आखडता घेत नाहीत. त्यांच्या या खर्चिक दागिन्यांमुळे प्रेक्षक अचंबित होतात. आता प्रेक्षकांना आगामी भागांमध्ये काही अनपेक्षित घटना घडताना पाहायला मिळतील.
ये रिश्ता क्या कहलाता है!’ सोमवार ते शुक्रवार रात्री 9.30 वाजता फक्त ‘स्टार प्लस’वर पाहता येईल.


Web Title: Makers get real bridal jewellery from Jaipur for a scene on the show
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.