२०२० हे वर्षे फारसे चांगले गेले नसले तरी नवीन वर्षातील उत्सवांच्या आगमनाने आपल्या सर्वांनाच अधिक उत्साही केले आहे. मकर संक्रांत हा वर्षाचा पहिला सण आहे आणि म्हणूनच याची तयारी आधीपासूनच जोरात सुरू झाली आहे. या सणाला महाराष्ट्रात काळे कपडे परिधान करण्याची परंपरा पाळली जाते. या निमित्ताने मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या अभिनेत्रींनीही काळ्या रंगाच्या आउटफिटमधील फोटोंतून आपल्या महिला चाहत्यांना प्रेरीत केले आहे.

अनिता दातेने हा काळ्या रंगाच्या साडीवर गोल्डन ब्लाउज लूक केला आहे. एक साधी केशरचना, साधी साडी, फार चमकदार नसलेला गोल्डन ब्लाउज आणि नाजूक दागिन्यातही अनिता दातेचे सौंदर्य खुलले आहे.

पारंपारिक साजेला थोडेसे हटके वळण देत, गौतमी देशपांडेचा लूक मकर संक्रांतीसाठी एक मोहक आउटफिट वाटतो आहे. साजेशा दागिन्यांसह निळ्या नक्षीच्या काळ्या साडीने गौतमीच्या सौंदर्याला चारचाँद लावले आहेत.

क्रिस्टल काळ्या मण्यांचा हार परिधान केलेल्या निवेदिता सराफ यांची नारिंगी किनार असलेली काळी साडी खूपच सुंदर आहे आणि त्यादेखील खूप सुंदर दिसत आहेत. या मध्ये त्यांनी घातलेल्या सोन्याच्या बांगड्या या लूकच्या सौंदर्यात अधिक भर घालते.  

तेजश्री प्रधान काळ्या प्रिंटच्या साडीत खूप सुंदर दिसते आहे. ती वेस्टर्न आउटफिट इतकीच साडीतही सुंदर आणि ग्लॅमरस दिसते आहे.

अन्विता फलटणकरची साधी काळी साडी तुमचे लक्ष सहज वेधून घेते. गोल्डन शेड्स असलेली प्लेन ब्लॅक साडी पारंपारिक आणि कॅज्युअल लूक असलेल्या या साडीत अन्विता खूप छान दिसते आहे.

झी मराठीच्या अभिनेत्रींनी मकर संक्रांतीसाठी खास काळ्या रंगांच्या मोहक साड्या परिधान करून आपले सौंदर्य खुलवले आहे.  झी मराठीवरील मकर संक्राती स्पेशल एपिसोड टीव्हीवरील प्रसारणाच्या एक दिवस आधी फक्त झी ५ क्लबवर पाहता येतील.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Makar sankranti 2021 :: Tejashree Pradhan, Anita Date, Gautami Deshpande's open beauty in black saree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.