कोरोना व्हायरस संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे.  लॉकडाऊनमुळे शूटिंग न होत असल्यामुळे सगळे कलाकार घरातच आहे. आपल्या फॅन्सशी संपर्क साधण्यासाठी ते सोशल मीडियावर बरीच सक्रिय झाले आहेत. लाईव्ह चॅट, फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ते चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत आहेत. अभिनेता जय भानुशालीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे या व्हिडीओत त्याची पत्नी माही विज त्याच्यावर खूप चिडलेली दिसतेय. 


स्पोट बॉयने वेबसाईटने शेअर केलेल्या व्हिडीओत माही म्हणतेय, जयाला वाटतं की हा सर्वांंत वाईट पिझ्झा आहे. मी रोज काही तरी नवीन डिश तायर करुन खायला घालते. तो नेहमी कही तरी यात प्रॉब्लेम शोधून काढतो. तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये ती जयला बोलतेय की, काही करता तर येत नाही 10 पैकी शून्य मार्क देईन तुला जर कोरोना व्हायरस नसता ना तर तुला घरातून हाकलवून काढले असते. अर्थात माही हे मस्करीत बोलते आहे. 


जय आणि माही यांचे लग्न २०११ मध्ये झाले होते. २०१९ मध्ये त्यांच्या घरी नन्ही परीचे आगमन झाले आह. माही आणि जय यांचे हे पहिले मूल असले तरी त्यांनी दोन मुले दत्तक घेतली आहेत. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mahi vij angry reaction on husband jay bahushali comment on wife cooking gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.