‘लागीरं झालं जी’ फेम अज्याचे Reels Video लावतील याडं, तुम्ही पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 02:12 PM2021-05-16T14:12:20+5:302021-05-16T14:13:56+5:30

नितीश चव्हाणचा हटके अंदाज पाहून चाहते फिदा; तुफान व्हायरल होत आहेत Reels व्हिडीओ

lagir jhal ji fame ajya aka nitish chavan reels video viral on socia media | ‘लागीरं झालं जी’ फेम अज्याचे Reels Video लावतील याडं, तुम्ही पाहिलेत का?

‘लागीरं झालं जी’ फेम अज्याचे Reels Video लावतील याडं, तुम्ही पाहिलेत का?

Next
ठळक मुद्देजेननेक्स्ट नावाची त्याने डान्स अकादमीही सुरू केली होती. अभिनयासोबतच नितीश डान्सिंगमुळेही लोकप्रिय आहे.

‘लागीरं झालं जी’ (Lagir Jhal Ji) या मालिकेतील अज्या आठवतो ना? होय, अज्या म्हणजेच नितीश चव्हाण (Nitish Chavan ). ‘लागीरं झालं जी’ मालिकेने रसिकांचे भरघोस मनोरंजन केले. या नितीशने साकालेला अज्या फारच भाव खावून गेला. ‘लागीरं झालं जी’ ही मालिका बंद झाली असली तरीही आजही अज्याला रसिक विसरलेले नाहीत. अजिंक्यचा लूक ऑनस्क्रीन लूक रसिकांमध्ये विशेषत: तरुणींमध्ये हिट ठरला. आता काय तर अज्याच्या Reels व्हिडीओने चाहत्यांना वेड लावले आहे. त्याचे Reels व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

या व्हिडीओमध्ये नितीश इंग्रजी, मराठी, हिंदी गाण्यांवर थिरकताना दिसतोय. अनेक फोटोंमध्ये त्याची मैत्रिण श्वेता खरातही धम्माल डान्स करताना दिसतेय.

नितीश आणि श्वेताच्या ‘रूपेरी वाळूत’ या गाण्यावरचा रिल व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.

तुम्हाला माहित नसेल पण, नितीशची पहिली आवड ही डान्स आहे. त्याची स्वत:ची डान्स अ‍ॅकेडमी सुद्धा होती. डान्समध्येच त्याला करिअर करायचे होते. अर्थात अनेक एकांकिका व नाटकांत त्याने काही अभिनयही केला होता. अशात ‘लागीरं झालं जी’साठी सहज म्हणून त्याने ऑडिशन दिले आणि या मालिकेसाठी त्याची निवडही झाली.

आता अभिनेता अशी एक नवी ओळख त्याने निर्माण केली आहे. पण नितीश डान्स कधीही विसरू शकत नाही. ते त्याचे पॅशन आहे.

 नितीशचा जन्म साता-यात झाला आहे. दापोलीत प्राथमिक शिक्षण, वाईमध्ये उच्चशिक्षण आणि पुढील शिक्षण त्याने पुण्यात पूर्ण केले. अभिनय आणि नृत्याची त्याला सुरुवातीपासूनच आवड होती.

जेननेक्स्ट नावाची त्याने डान्स अकादमीही सुरू केली होती. अभिनयासोबतच नितीश डान्सिंगमुळेही लोकप्रिय आहे.  लागिरं झालं जी या मालिकेने छोट्या पडद्यावर एंट्री करताच अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: lagir jhal ji fame ajya aka nitish chavan reels video viral on socia media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app