‘कुमकुम भाग्य’ फेम लीना जुमानीचा साखरपुडा मोडला; म्हणाली, कारण सांगणार नाही...!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 11:11 AM2021-06-02T11:11:49+5:302021-06-02T11:16:32+5:30

लीना व तिचा होणारा पती राहुल तसे वर्षभरापूर्वीच एकमेकांपासून विभक्त झाले होते. पण आता...

kumkum bhagya actress leena jumani called off her engagement and is ready to find new partner | ‘कुमकुम भाग्य’ फेम लीना जुमानीचा साखरपुडा मोडला; म्हणाली, कारण सांगणार नाही...!

‘कुमकुम भाग्य’ फेम लीना जुमानीचा साखरपुडा मोडला; म्हणाली, कारण सांगणार नाही...!

Next
ठळक मुद्देलीना जुमानी ही टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री आहे. विक्रम भट यांच्या ‘माया 2’ या वेबसीरिजनंतर ती चर्चेत आली होती.

टीव्ही स्टार्सची पर्सनल लाईफ सध्या चर्चेत आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम करण मेहरा व अभिनेत्री निशा रावल यांच्यातील कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आला आहे. आता ‘कुमकुम भाग्य’ (Kumkum Bhagya) फेम अभिनेत्री लीना जुमानी  (Leena Jumani) हिचा साखरपुडा मोडला आहे.
ई-टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. लीनाने साखरपुड्याच्या 5 वर्षांनंतर तिचं हे नातं संपुष्टात आणलं आहे. लीना व तिचा होणारा पती राहुल सचदेव तसे वर्षभरापूर्वीच एकमेकांपासून विभक्त झाले होते. पण आता लीनाने साखरपुडा मोडल्याचे कन्फर्म केले आहे. लीनाने स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राहुल हा युएसमध्ये बिझनेसमॅन आहे.

आमच्यात फार काही ठीक सुरू नव्हते. तीन वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंर 2014 साली आमचा साखरपुडा झाला होता. आता मी व राहुल सोबत नाही. आम्ही साखरपुडा केला, लग्न करण्याचा आमचा प्लान होता. पण काही गोष्टी ठीक नव्हत्या. आमच्यामध्ये काय झाले, हे मी सांगू इच्छित नाही. पण तो जिथे कुठे राहिल तिथे त्याने आनंदात राहावे,अशी माझी इच्छा आहे, असे लीना म्हणाली.
लीना जुमानी ही टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री आहे. विक्रम भट यांच्या ‘माया 2’ या वेबसीरिजनंतर ती चर्चेत आली होती. या वेबसीरिजमधील तिच्या बोल्ड अदांची खूप चर्चा झाली होती. या सीरिजमध्ये लीना मुख्य भूमिकेत होती.

कोरोना नसता तर...
नव्या रिलेशनशिपसाठी तयार आहेस का? असे विचारले असता ती म्हणाली, माझे एक रिलेशनशिप अयशस्वी ठरले म्हणून प्रेमावरचा विश्वास कमी झालेला नाही. मी  नव्याने सुरूवात करू इच्छिते. तसेही मी लवकरात लवकर सेटल व्हावे, अशी माझ्या आईवडिलांची इच्छा आहे. सध्या मी माझी सिंगल स्पेस एन्जॉय करतेय. आता आपण सर्व कोरोना महामारीमुळे चिंतीत आहोत. कोरोना नसता तर कदाचित मी लवकरच स्वत:साठी कुणाला तरी पसंत केले असते.

Web Title: kumkum bhagya actress leena jumani called off her engagement and is ready to find new partner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app