'बिग बॉस'मधून बाहेर येताच कुमार सानूवर भडकला मुलगा जान, म्हणाला - संगोपनावर त्यांनी बोलू नये...

By अमित इंगोले | Updated: November 23, 2020 14:36 IST2020-11-23T14:29:50+5:302020-11-23T14:36:30+5:30

शोमधून बाहेर येताच जानने वडील कुमार सानू यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला की, वडिलांकडून त्याच्या पालन पोषणावर प्रश्न उपस्थित करणं खेदजनक आहे.

Kumar Sanu's son Jaan Kumar Sanu rages on his father | 'बिग बॉस'मधून बाहेर येताच कुमार सानूवर भडकला मुलगा जान, म्हणाला - संगोपनावर त्यांनी बोलू नये...

'बिग बॉस'मधून बाहेर येताच कुमार सानूवर भडकला मुलगा जान, म्हणाला - संगोपनावर त्यांनी बोलू नये...

कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू 'बिग बॉस १४'च्या घरातून बाहेर आला आहे. शोमधून बाहेर येताच जानने वडील कुमार सानू यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला की, वडिलांकडून त्याच्या पालन पोषणावर प्रश्न उपस्थित करणं खेदजनक आहे. काही दिवसांपूर्वी कुमार सानू म्हणाले होते की, त्यांची पत्नी रीताने मुलाचं चांगलं संगोपन केल नाही.

'संगोपनावर बोट उचलण्याचा हक्क कुणाला नाही'

दैनिक भास्करसोबत बोलताना जान म्हणाला की, 'कुणालाही माझ्या संगोपनावर प्रश्न उपस्थित करण्याचा हक्क नाही. खेद वाटतोय की, माझे वडील तेच करत आहेत. मला माहीत आहे की, नकळत माझ्याकडून चूक झाली होती. मी मुद्दामहून मराठी भाषेबाबत बोललो नव्हतो. जर माझ्याकडून काही चूक असेल तर माझ्या विरोधात व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकण्याचा त्यांना काहीच  हक्क नाही'.

तो पुढे म्हणाला की, 'कोणतेही वडील आपल्या मुलाविरोधात बोलत नाही आणि तेही अशाप्रकारे सोशल मीडियावर मला त्यांनी जे केलं त्याचं फार दु:खं आहे. पण सत्य हेही आहे की ते माझे वडील आहेत. ते कसेही असो काहीही बोलो मी त्यांच्या विरोधात नाही जाऊ शकत. हेच माझं संगोपन आहे'.

'त्यांनी माझी जबाबदारी घेतली नाही'

जान म्हणाला की, 'खरं सांगायचं तर माझ्या वडिलांनी कधी माझी जबाबदारी घेतली नाही. त्यांनी माझ्या संगोपनाबाबत न बोलणं बरं राहील. मला त्यांना कोणत्याही प्रकारचं उत्तर द्यायचं नाही. एकीकडे त्यांनी माझ्या संगोपनाबाबत व्हिडीओ पोस्ट केला आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं. कदाचित त्यांना आतून माझ्याबाबत मिक्स्ड फीलिंग्स असतील. मी त्यांच्यासोबत याबाबत नक्की बोलणार'.
 

Web Title: Kumar Sanu's son Jaan Kumar Sanu rages on his father