तेरे दर पर सनम या गाण्याच्या निमित्ताने कुमार सानू आणि महेश भट्ट आले एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 07:08 AM2018-02-15T07:08:49+5:302018-02-15T12:38:49+5:30

फिर तेरी कहानी याद आयी या चित्रपटातील तेरे दर पर सनम हे गाणे चांगलेच गाजले होते. हे गाणे पुजा ...

Kumar Sanu and Mahesh Bhatt came together to celebrate this song at your rate | तेरे दर पर सनम या गाण्याच्या निमित्ताने कुमार सानू आणि महेश भट्ट आले एकत्र

तेरे दर पर सनम या गाण्याच्या निमित्ताने कुमार सानू आणि महेश भट्ट आले एकत्र

googlenewsNext
र तेरी कहानी याद आयी या चित्रपटातील तेरे दर पर सनम हे गाणे चांगलेच गाजले होते. हे गाणे पुजा भट आणि राहुल रॉय यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते. या गाण्याला आज इतकी वर्षं झाली असली तरी या गाण्याची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाही. हे रोमँटिक गीत नव्वदीच्या दशकातील असले तरी आजच्या तरुणांना देखील ते आपलेसे वाटते. फिर तेरी कहानी याद आयी या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश भट्ट यांनी केले असून या चित्रपटाला संगीत अन्नू मलिकने दिले होते तर तेरे दर पर सनम हे गाणे कुमार सानू यांनी गायले होते. या गाण्याची टीम एका मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येणार आहे.
महेश भट्ट आणि कुमार सानू आता पुन्हा एकदा नामकरण या मालिकेसाठी या गाण्याची जादू निर्माण करणार आहेत. 
तेरे दर पर सनम हे गाणे अवनी आणि नीलवर चित्रीत केले जाणार आहे. महेश भट्ट यांच्या नामकरण या मालिकेसाठी गायक कुमार सानू हे गाणे पुन्हा एकदा रेकॉर्ड करणार आहेत. या गाण्यातून अवनी आणि नील यांची प्रेमकथा दिसून येणार असून या गाण्यात शेकोटी आणि त्या भोवतालचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे हे गाणे आपल्याला ९० च्या दशकात घेऊन जाणार आहे. या गाण्याबद्दल नामकरण या मालिकेमध्ये अवनीची भूमिका साकारणारी अदिती राठोड सांगतो, “आमच्या नामकरण या मालिकेसाठी एवढ्‌या वर्षांनंतर महेश भट सर आणि कुमार सानू सर पुन्हा एकत्र येत आहेत हे पाहून मी खूप खुश झाले आहे. महेश सरांच्या कामाची मी चाहती असून हे क्लासिक गाणे माझे आवडते आहे.”
नामकरण या मालिकेत तेरे दर पर समन हे गाणे वापरण्याची महेश भट यांची कल्पना कुमार सानू यांना खूप आवडली असून या मालिकेसाठी ते या गाण्याचे लवकरच रेकॉर्डिंग करणार आहेत. 

Also Read : ​‘नामकरण’मध्ये अवनीचा मृत्यू?

Web Title: Kumar Sanu and Mahesh Bhatt came together to celebrate this song at your rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.