'राणादा' सारखी लोकप्रिय भूमिका निभावल्यानंतर हार्दिक जोशीला येतय एका गोष्टीचे दडपण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 01:54 PM2021-08-30T13:54:20+5:302021-08-30T13:58:19+5:30

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेतुन सर्वांचा लाडका राणा म्हणजेच हार्दिक जोशी एका नव्या भूमिकेतून सगळ्यांच्या भेटीला येण्यास फार उत्सुक आहे.

Know Why Hardik Joshi feels nervous even after playing role of famous character Rana Da in Tuzhyat Jeev Rangala | 'राणादा' सारखी लोकप्रिय भूमिका निभावल्यानंतर हार्दिक जोशीला येतय एका गोष्टीचे दडपण

'राणादा' सारखी लोकप्रिय भूमिका निभावल्यानंतर हार्दिक जोशीला येतय एका गोष्टीचे दडपण

googlenewsNext

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून घराघरात पोहचलेला राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी आता नव्या भूमिकेतून रसिकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. हार्दिक जोशीला नव्या रुपात पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. मालिकेचे प्रोमो झळकल्यापासून कमालीची उत्सुकता वाढल्याचे पाहायला मिळतंय. 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेतुन सर्वांचा लाडका राणा म्हणजेच हार्दिक जोशी एका नव्या भूमिकेतून सगळ्यांच्या भेटीला येण्यास फार उत्सुक आहे. त्याच्या या नवीन मालिकेबद्दल आणि भूमिकेबद्दल त्याने त्याचा अनुभव शेअर केलाय. 

हार्दिक साकारत असलेला सिद्धार्थ हा एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये वाढलेला आहे. कुटुंबीय पारंपरिक असल्यामुळे घरचं वातावरण देखील पारंपरिक आहे. सिद्धार्थ हा खूप प्रॅक्टिकल मुलगा आहे आणि त्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे.जेव्हा या भूमिकेसाठी हार्दिकला विचारण्यात आलं तेव्हा क्षणात होकार दिला. याविषयी त्याने सांगितले की,राणामुळे माझी तयार झालेली इमेज ही खूप वेगळी आहे आणि त्याच्यापेक्षा वेगळ्या भूमिकेसाठी मला विचारण्यात आलं त्यामुळे मी लगेचच होकार दिला.

'राणा दा' सारखी लोकप्रिय भूमिका निभावल्यानंतर आता त्याच्या अगदी विरुद्ध भूमिका साकारताना  थोडंसं दडपण आलंय. अजूनही चाहते मला राणा म्हणून ओळखतात आणि त्याच नावाने हाक मारतात. त्यामुळे सिद्धार्थ म्हणून देखील माझी ओळख व्हावी यासाठी मी प्रयत्न करतोय.

त्यासाठी भूमिकेची देहबोली, दिसणं, बोलणं यासगळ्याकडे मी खूप लक्ष देतोय. राणा हा खूप इमोशनल होता त्याउलट सिद्धार्थ हा खूप प्रॅक्टिकल आहे त्यामुळे विरुद्ध टोकाची भूमिका निभावताना मी माझे १०० टक्के देता येईल यासाठी प्रयत्न करतोय. रसिक देखील राणा सारखंच सिद्धार्थवर पण प्रेम करतील याची मला खात्री आहे.

मालिकेच्या प्रोमोज मधून रसिकांना मला वेगळ्या लुक मध्ये पाहिलं आहे. त्यामुळे ते खूप उत्सुक आहेत मला या फ्रेश लुक मध्ये पाहायला. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेनंतर आता राणा या व्यक्तिरेखेतून बाहेर येऊन मी काहीतरी नवीन चाहत्यांसाठी सादर करणार आहे. त्यामुळे रसिकांना मालिकेबद्दल खूप आतुरता आहे.नुकतंच शूटिंग सुरु झालं आहे.अगदी थोड्याच दिवसात आम्हा सगळ्यांची गट्टी जमली आहे. आता कुठे धमाल मस्तीला सुरुवात झाली आहे,  इथून पुढे आणखी नवीन किस्से हळू हळू रंगतीलच.  
 

Web Title: Know Why Hardik Joshi feels nervous even after playing role of famous character Rana Da in Tuzhyat Jeev Rangala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.