ठळक मुद्देया व्हिडिओत आपल्याला किशोरी शहाणे यांना पाहायला मिळत असून शिवच्या अमरावतीच्या घरात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या व्हिडिओत शिवच्या कुटुंबियांसोबत किशोरी शहाणे केक कापताना दिसत असून त्या त्यांच्या घरातील प्रत्येक सदस्याला हा केक भरवताना दिसत आहेत.

कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो बिग बॉस मराठीचा दुसरा सीझन संपून अनेक महिने झाले आहेत. मात्र या सीझनची चर्चा अद्याप होताना पाहायला मिळते आहे. याचं कारण आहे यंदाच्या सीझनचा विजेता ठरलेला शिव ठाकरे आणि अभिनेत्री वीणा जगताप यांचं अफेयर. बिग बॉस मराठी २ च्या घरात शिव आणि वीणाची लव्हस्टोरी चांगलीच रंगली होती. त्यांच्या नात्यावर त्यावेळी बरीच टीकादेखील झाली होती. शो संपल्यानंतर रोमान्सही संपेल, असा अंदाजही अनेकांनी वर्तवला होता. पण असं काहीच झालं नाही. उलट ‘बिग बॉस मराठी २’ संपल्यानंतर शिव आणि वीणाचा रोमान्स आणखी जोरात सुरू झाला आहे. पण शिवच्या घरी वीणाचे नव्हे तर बिग बॉसमधील दुसऱ्याच सदस्याचे नुकतेच जंगी स्वागत करण्यात आले.

 

शिव ठाकरे सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो त्याचे फोटो, व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याने नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून याच व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. या व्हिडिओत आपल्याला किशोरी शहाणे यांना पाहायला मिळत असून शिवच्या अमरावतीच्या घरात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या व्हिडिओत शिवच्या कुटुंबियांसोबत किशोरी शहाणे केक कापताना दिसत असून त्या त्यांच्या घरातील प्रत्येक सदस्याला हा केक भरवताना दिसत आहेत. शिवने या पोस्टसोबत लिहिले आहे की, किशोरी शहाणे यांचे आमच्या अमरावतीच्या घरात स्वागत...

शिवने पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर किशोरी शहाणे यांनी त्याचे आभार मानले आहेत. त्यांनी या व्हिडिओवर कमेंट करताना लिहिले आहे की, मला दिलेल्या या खास सरप्राईजसाठी आभार... शिवबा तुला आणि तुझ्या कुटुंबियांना खूप सारे प्रेम...

शिवने शेअर केलेल्या या व्हिडिओला सोशल मीडियावर खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी पाहिला असून अनेकांनी यावर कमेंट देखील केले आहे. 

Web Title: kishori shahane warm welcome in shiv thakare house in amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.